केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा श्रद्धांजली संदेश…
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त धक्कादायक आहे.
अजितदादा आपल्यातून गेले ही गोष्ट स्वीकारायला मन अजूनही धजावत नाही.
माझ्यावर पुण्याच्या महापौरपदाची जबाबदारी असताना विविध विकासकामांच्या निमित्ताने दादांशी निकटचा संबंध आला. विविध विषयांवरील त्यांची मते अतिशय सुस्पष्ट आणि परखड होती. त्यांची विकासाची दूरदृष्टी, वक्तशीरपणा, ठोस निर्णय घेण्याची क्षमता, प्रशासनावरील घट्ट पकड वाखाणण्याजोगी होती. कोरोना साथीच्या संकटात पुणे शहरातील स्थिती नियंत्रणात आणण्यास दादांचे मोठे सहकार्य मिळाले. अतिशय कठीण परिस्थिती त्यांनी धैर्याने सांभाळली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती मिळो.
भावपूर्ण श्रद्धांजली!
–मुरलीधर मोहोळ ( केंद्रीय सहकार राज्यमंत्री)

