हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”

Date:

प्रत्यक्षदर्शींनी सांगितला… भीषण , थरार…
पुणे :सकाळचे पावणे नऊ वाजले होते.. अजितदादांचं विमान अगदी पाच मिनिटांत लँड होणार होतं. पण नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी होतं… परिस्थिती लँडिंग घेण्यासरखी नव्हती, त्यामुळे ते विमान घिरट्या घेत होतं.
शेवटी विमानतळाच्या जवळच शेतात ते कोसळलं अन् स्फोट झाला. कामाचा माणूस अशी ओळख असलेले महाराष्ट्राचे अजितदादा मरण पावले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेले अनुभव तर फारच भीषण आणि थरारक आहेत.

बुधवार, दि. २८ जानेवारी रोजी सकाळी ८ ते ९ वाजण्याच्या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला.

घटनास्थळी धाऊन गेलेल्या एका महिलेने सांगितलं की, विमानाने एक घिरटी मारली आणि दुसऱ्यांदा ते घिरटी मारत होतं.. ते खूपच खालून गेलं आणि कोसळलं आणि स्फोट झाला.. आम्ही फोन केल्यानंतर विमानतळाचे पोलिस आणि कर्मचारी धाऊन आले.. परंतु स्फोट एवढा होता की कोणी काहीच करु शकत नव्हतं. त्यानंतर अग्मिशमन दल दाखल झालं.

दुसऱ्या एका महिलेने अनुभव सांगितला, आम्ही बादलीने पाणी आणत होतो. साईडला एक बॉडी उडून पडली होती.. शीर नव्हतं फुगलेली बॉडी होती. आम्ही ब्लँकेट दिलं आणि पोलिसांनी बॉडी गुंडाळून घेतली.

तिसऱ्या एका व्यक्तीने सांगितलं की, सकाळी पावणे नऊच्या सुमारास विमान कोसळलं आणि लगेच दोन बॉडी बाहेर फेकल्या गेल्या.. चेहरा काहीच दिसत नव्हता. गॉगल आणि वॉचवरुन हे दादाच आहेत, हे आम्ही ओळखलं. आम्ही पहिल्यांदा दादांची बॉडी काढली. हे विमान विमानतळावर केवळ पाच मिनिटांत उतरले असते, पण दुर्दैवी मृत्यू झाला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

”असं नेतृत्व घडायला मोठा काळ जातो. महाराष्ट्राच्या विकासामध्ये अजितदादांचं मोठं योगदान होतं. त्यांच्या कुटुंबावर हा फार मोठा आघात आहे. सकाळपासून मी सगळ्यांच्या संपर्कात आहे. देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री यांनाही घडलेल्या परिस्थितीची कल्पना दिली आहे. त्यांनी याबद्दल प्रचंड दुःख व्यक्त केलं आहे. या घटनेमुळे देशामध्ये हळहळ पसरलेली आहे. पुढच्या सगळ्या गोष्टी परिवाराशी चर्चा करुन ठरवण्यात येतील. सुप्रियाताई आणि पार्थ पवारांशी माझं बोलणं झालं आहे. संपूर्ण परिवार बारामतीत पोहोचल्यानंतर त्यांच्या संमतीने पुढचे निर्णय घेतले जातील. तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असून शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. दमदार आणि दिलदार मित्र मी गमावलेला आहे.” अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वर्गमित्रांकडून ‘सहजीवन’ वृद्धाश्रमाला ७५ हजारांची मदत

डॉ. दिलीप देवधर यांच्या पंचत्तरीनिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात मदत पुणे...

नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे कलावंत गुढी

पुणे : नवीन वर्षात उत्तमोत्तम नाट्य कलाकृतींची निर्मिती व्हावी...

रा.स्व.संघाची – संघ शताब्दीच्या माध्यमातून यशोगाथा मांडत मध्य पुण्यात भव्य शोभायात्रा

हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे गुढीपाडव्यानिमित्त आयोजन ; विविध चित्ररथांचा...