२८ जानेवारी २०२६ | पुणे, महाराष्ट्र
भारत फोर्ज परिवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि एक दिग्गज नेते, अजित पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करत आहे. या दुःखाच्या काळात आम्ही त्यांचे कुटुंबीय – श्रीमती सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार आणि आप्तेष्ट यांच्या बरोबर आहोत.
अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासात, विशेषतः सिंचन, शेती आणि ग्रामीण विकास क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. एक गतिमान आणि निर्णायक नेता अशी त्यांची ख्याती होती. त्यांची प्रशासकीय क्षमता आणि सार्वजनिक सेवेतील योगदान याचा जनमानसावर कायमचा प्रभाव पडला आहे. त्यांची उणीव प्रत्येक क्षणी सर्वांना निश्चित जाणवेल यात शंका नाही.
महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या दुःखद विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रति आम्ही मनापासून संवेदना व्यक्त करतो. या प्रचंड दुःखाला सामोरे जाण्यासाठी देव त्यांना शक्ती देवो अशी प्रार्थना करतो.
भारत फोर्ज महाराष्ट्रातील जनतेसोबत एकजुटीने उभे आहे आणि या दुःखद घटनांमुळे प्रभावित झालेल्या प्रत्येकासाठी शक्ती, धैर्य आणि शांततेसाठी प्रार्थना करत आहोत!
— बाबा कल्याणी, अमित कल्याणी आणि कल्याणी ग्रुप

