डिजिटल पेमेंट सेवा, डिजिटल वितरण सेवा आणि वित्तीय सेवा यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करणाऱ्या फोनपे लिमिटेड या तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीने ‘सेबी’कडे आपला ‘यूडीआरएचपी-१’ दाखल केला आहे.
कंपनी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ग्राहक पेमेंट, व्यापारी पेमेंट, कर्ज वितरण तसेच विमा वितरण या सेवा पुरविते. याशिवाय कंपनीने दोन नवीन प्लॅटफॉर्म विकसित केले असून त्यांचा वेगाने विस्तार करत आहे. यातील एक आहे Share.Market हा या कंपनीचा स्टॉक ब्रोकिंग आणि म्युच्युअल फंड्स वितरणासाठीचा प्लॅटफॉर्म आहे. दुसरा आहे इंडस अॅपस्टोअर. हा मोबाईल अॅप्ससाठी मार्केटप्लेस म्हणून काम करतो. कंपनीचे सर्व प्लॅटफॉर्म पुरस्कारप्राप्त आणि उच्च क्षमतेच्या तंत्रज्ञानावर आधारित आहेत. ही तंत्रज्ञान प्रणाली मजबूत आणि विश्वासार्ह आहे. ती एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर काम करू शकते, सुरक्षित आहे आणि खर्चही कमी ठेवते. त्यामुळे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर तसेच नव्या गरजांसाठी ती सहज वापरता येते.
या यूडीआरएचपी अंतर्गत कंपनीचे सध्याचे भागधारक आपले ५०,६६०,४४६ पर्यंत इक्विटी शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध करून देत आहेत. प्रत्येक शेअरचे दर्शनी मूल्य १ रुपया आहे.
एप्रिल २०१६ मध्ये युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) ही प्रणाली सुरू झाल्यानंतर, ऑगस्ट २०१६ मध्ये या कंपनीने यूपीआयवर आधारित अॅप सुरू केले. असे करणारी ही भारतातील पहिली खासगी, बॅंकेतर कंपनी ठरली, अशी माहिती ‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’च्या (एनपीसीआय) आकडेवारीवर आधारित रेडसीयर अहवालात नमूद करण्यात आली आहे.
डिसेंबर २०२० ते सप्टेंबर २०२५ या काळात यूपीआय व्यवहारांची संख्या आणि एकूण व्यवहार मूल्य (टीपीव्ही) या दोन्ही बाबतीत कंपनीने सतत आघाडी ठेवली. त्यामुळे ती भारतातील सर्वात मोठी डिजिटल पेमेंट्स प्लॅटफॉर्म बनली आहे, असे ‘एनपीसीआय’च्या आकडेवारीवर आधारित रेडसीयर अहवालात नमूद आहे. ३० सप्टेंबर २०२५ रोजी कंपनीकडे सुमारे ६५.७५ कोटी नोंदणीकृत वापरकर्ते आणि ४.७२ कोटी नोंदणीकृत व्यापारी होते.
कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, जेपी मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मॉर्गन स्टॅन्ले इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, ॲक्सिस कॅपिटल लिमिटेड, गोल्डमन सॅक्स (इंडिया) सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड, जेफरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि जे. एम. फायनान्शियल लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.
‘रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’द्वारे ऑफर करण्यात येणारे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) या शेअर बाजारांमध्ये नोंदविण्याचा कंपनीचा प्रस्ताव आहे.
‘यूडीआरएचपी-१’ची लिंक:

