महाराष्ट्रातील बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्यासोबत विमानात असलेले पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर एचसी विदिप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांचाही मृत्यू झाला आहे.आता अपघाताच्या अगदी आधीची कहाणी समोर आली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, विमानाची धुरा कॅप्टन सुमित कपूर आणि शांभवी पाठक यांच्या हातात होती. सकाळी धुक्यामुळे दृश्यमानता कमी होती. वैमानिकांनी बारामती विमानतळाच्या रनवे 11 वर उतरण्याचा प्रयत्न केला.
मात्र, त्यांना रनवे दिसला नाही. वैमानिकांनी विमान पुन्हा वर घेतले. थोड्या वेळाने पुन्हा उतरण्याचा प्रयत्न केला. यावेळी विमान रनवेच्या दिशेने सरकले, पण रनवेला स्पर्श करण्यापूर्वीच ते उलटले आणि जमिनीवर आदळले. अपघाताच्या अगदी आधी कॅप्टन शांभवी पाठक यांचे शेवटचे शब्द होते – ओह शिट…ओह शिट.
विमानातील प्रवाशांची नावे
खाजगी VSR कंपनीचे विमान
- अजित पवार 2. मुंबई पीएसओ HC विदीप जाधव 3. पायलट कॅप्टन सुमित कपूर 4. कॅप्टन संभवी पाठक 5. पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट

