बारामती–राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सर्वात धडाडीचे नेते म्हणून प्रचलित असलेले आणि दिवसाची सुरुवात पहाटे करून अवघ्या आपल्या महाराष्ट्राला एक आदर्श घालून देणारे महाराष्ट्राचे दादा व्यक्तिमत्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज (28 जानेवारी) बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झाले. आज (28 जानेवारी) सकाळी बारामती दौऱ्यासाठी निघताना अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. विमान लँडिग होतानाच अपघातग्रस्त झाले. अपघातानंतर विमानाचे अक्षरश: तुकडे झाले होते. विमानाची स्थिती पाहूनच कोणीही वाचू शकणार नाही अशी माहिती समोर येत होती. अवघ्या काही वेळातच अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (६६) यांचे बुधवारी सकाळी बारामती येथे त्यांचे विमान कोसळले. बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान हा अपघात झाल्याचे वृत्त आहे. विमानात त्यांच्यासोबत असलेले त्यांचे वैयक्तिक सहाय्यक, सुरक्षा कर्मचारी आणि विमान कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाला.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, पवार एका खासगी चार्टर्ड विमानाने मुंबईहून बारामतीला गेले होते. लँडिंग दरम्यान विमान धावपट्टीवरून घसरले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) या अपघातात पाच जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. सुरुवातीला सहा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त होते.
महाराष्ट्र पंचायत निवडणुकीसाठीच्या चार सभांना उपस्थित राहण्यासाठी अजित पवार बारामतीला जात होते. अपघाताची माहिती मिळताच पवारांचे कुटुंबीय त्यांच्या मुंबईतील निवासस्थानावरुन रवाना झाले आहेत.
बारामती विमानतळाजवळील एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, “मी स्वतःच्या डोळ्यांनी ते पाहिले. ते भयानक होते. विमान घसरले तेव्हा आम्हाला माहित होते की ते कोसळेल आणि नेमके तेच घडले. विमान उतरताच एक मोठा स्फोट झाला. आम्ही ताबडतोब घटनास्थळी धावलो आणि विमान आगीत बुडालेले पाहिले. त्यानंतर आणखी चार-पाच स्फोट झाले. अनेक लोक आले आणि लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण आग इतकी मोठी होती की आम्ही काहीही करू शकलो नाही. अजित पवार विमानात होते आणि जे घडले ते भयानक होते. मी ते शब्दात वर्णन करू शकत नाही.
अपघातात मृत्युमुखी पडलेले राष्ट्रीय नेते
गोपीनाथ मुंडे
दिनांक: ३ जून २०१४
मृत्यू: रस्ते अपघातात निधन (कार अपघात)
नेते: भारतीय जनता पक्ष (भाजपा)
पद: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री
संजय गांधी
दिनांक: २३ जून १९८०
मृत्यू: दिल्ली (सफदरजंग विमानतळाजवळील विमान अपघातात)
पक्ष: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
माधवराव सिंधिया
दिनांक: ३० सप्टेंबर २००१
मृत्यू: चार्टर्ड विमान अपघातात निधन
पक्ष: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पद: माजी नागरी विमान वाहतूक मंत्री, ज्येष्ठ नेते
जी.एम.सी. बालयोगी
दिनांक: ३ मार्च २००२
मृत्यू: कमी दृश्यमानतेमुळे हेलिकॉप्टर अपघातात निधन
स्थळ: आंध्र प्रदेश (कृष्णा जिल्ह्यातील तलावात कोसळले)
पक्ष: तेलुगू देसम पार्टी (टीडीपी), लोकसभेचे अध्यक्ष होते
वाय.एस. राजशेखर रेड्डी
दिनांक: २ सप्टेंबर २००९
मृत्यू: हेलिकॉप्टर अपघातात निधन
पक्ष: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पद: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते

