राजकीय वर्तुळात खळबळ माजविणारी बातमी
पुणे- चंद्रपूरात कॉँग्रेसचे नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याचे एकीकडे सुधीर मूनगुंटीवार यांनी म्हटले आहेत तर दुसरीकडे पुण्यात एकहाती मोठे बहुमत मिळविलेल्या भाजपा च्या नेत्याशी कॉँग्रेसच्या अनेक नगरसेवकानी हातमिळवणी केल्याचे वृत्त येथे हाती आले आहे.आता हि हातमिळवणी पक्ष बदल स्वरूपात होणार कि अन्य हे मात्र येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे .पुणे महापालिकेत कॉँग्रेसचे 15 नगरसेवक निवडून आले आहेत.भाजपचे 119 नगरसेवक निवडून आले आहेत.अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 30 नगरसेवक निवडून आलेत ठाकरेंच्या शिवसेनेचा 1 निवडून आला आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांना भुईसपाट करण्यात मोहोळ आणि गणेश बिडकर यांची कुशल राजनीती असल्याचे मानले जाते आहे.कॉँग्रेसचे पूर्वीचे 9 नगरसेवक आता 15 संख्येवर पोहोचले असल्याने कॉंग्रेस पक्ष वाढला असे दिसत असले तरी यामागे मोठे राजकीय षड्यंत्र असल्याचे सांगितले जाते आहे.त्याचाच भाग म्हणून भाजपच्या मातब्बर नेत्यांच्या विरोधात भाजपचेच चेहरे ,कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून उभे राहिल्याचे दिसले होते . दोन्ही राष्ट्रवादी निवडणुकीपूर्वी एकत्र येण्यासाठी जे घडले ते राजकारण ज्या दोघांनी घडवून आणले ते दोघे आता नगरसेवक उरलेले नाहीत आणि त्यांनी शरद पवार गटाचा व्यवस्थित सफाया केला आहे असा आरोप राष्ट्रवादीतून कॉंग्रेस मध्ये गेलेल्या माजी महापौरांनी केला आहेच . दरम्यान अजित पवार गटाला योगायोगाने अमोल बालवडकर,नीलेश निकम आणि बाबूराव चांदेरे यांसारखे नगरसेवक मिळाले . स्वप्न जरी साकार झाले नाही तरी अजित पवार स्वतः राज्यात महायुतीत आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून सत्तेत आहेत .या पार्श्वभूमीवर केवळ काँग्रेस हाच विरोधी पक्ष अशी अनेकांची भावना असताना मोठ्या कौशल्याने मोहोळ यांनी आखलेली राजनीति आता कदाचित समोर येईल असे अनेकांना वाटते आहे.काँग्रेस मधील मातब्बर या निवडणुकीत घरी बसल्याने किंवा बसविल्याने अनेकांनी तोंडात बोटे घातली ही यामागील कारण आहे. ज्यांनी कधी कोणाचे रेशन कार्ड काढून दिले नाही आधार कार्ड काढून दिले नाही असे चेहरे केवळ कमळ चिन्ह घेऊन आता महापालिकेत नगरसेवक म्हणून झळकणार आहेत ज्यांची संख्या ६० टक्के एवढी असणार आहे. काँग्रेस मध्ये केवळ शहर अध्यक्ष असलेले अरविंद शिंदे यांच्या हाती विरोधी पक्ष म्हणून खरी मदार आहे. आणि त्यांच्या कुशलतेची पुढील काळात कसोटी लागणार आहे. कॉंग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना त्यांचाच आसरा असणार आहे, काँग्रेस गटनेता पद आणि एकूणच काँग्रेस पक्ष आता तेच चालवतील असे दिसत असताना भाजपा नेत्यांनी ‘मोठा गळ ‘ टाकला आहे.ज्याकडे काँग्रेसचे अनेक नगरसेवक खेचले गेले नाहीत तर नवलच . काँग्रेस भवनात निंवडणुका झाल्यावर शहर अध्यक्षांनी 2/ 3 वेळ सर्व निवडून आलेल्या नगरसेवकांच्या बैठक घेतल्या.पण महापालिकेतील उपमहापौर पदा पासून ते स्थायी समितीचे सदस्य पद,शिक्षणविभाग आणि विविध समित्या यांचे सदस्यपद एवढेच नव्हे तर वॉर्ड स्तरीय निधी मध्ये भाजपच्या सीनियर नेत्या प्रमाणे तरतूद मिळणे आशा विविध बाबी बद्दल गेल्या टर्म मधील अनुभव आणि राजनीति पाहता त्या अनुषंगाने काँग्रेसच्या 10 नगरसेवकांना खेचले जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. काँग्रेस मध्ये राहून 5 वर्षे नगरसेवक पदावरून काय करता येईल आणि भाजपात जाऊन 5 वर्षात नगरसेवक पदावरून काय करता येईल यांचा अंदाज बांधून आता हालचाली होण्याची शक्यता नाकारता येत नाही.भाजपा नेत्यांच्या म्हणण्यानुसार आम्हाला बहुमत असल्याने आशा गोष्टींची गरज नसल्याचे म्हटले जात असले तरी शिंदे सेना,मनसे पेक्षा काँग्रेस कमजोर करण्याची जबाबदारी पुण्यातील भाजपा नेत्यावर आहे.आणि 9 चे 15 नगरसेवक जरी निवडून आले तरी संबंधित भाजपा नेत्यांनी काँग्रेस कमजोर करण्याची ७ ० टक्के जबाबदारी पार पाडल्याचा दावा भाजपच्या राजकीय स्तरावर होतो आहे. आता आणखी काही नगरसेवक भाजपा नेत्याशी हातमिळवणी करत असल्याचे वृत्त आल्याने कोणाला काही फारसे नवल वाटेनासे झाले आहे.

