नवी दिल्ली-
राजीनामा देऊन 6 महिने आणि अर्ज करून 5 महिने उलटले आहेत, परंतु माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड अजूनही एका खाजगी फार्म हाऊसमध्ये राहत आहेत. बंगला मिळण्यास विलंब झाल्याने धनखड यांच्या जवळचे लोक म्हणतात, ‘सप्टेंबरमध्ये सांगण्यात आले होते की त्यांच्या नावाने बंगला अलॉट झाला आहे. दुरुस्तीला सुमारे 3 महिने लागतील. नोव्हेंबरमध्ये आणि नंतर जानेवारीत बंगल्याची स्थिती विचारली असता, पुन्हा दुरुस्तीचीच गोष्ट सांगण्यात आली.’
माजी उपराष्ट्रपतींना वाटप करण्यात आल्याचे सांगितले जात असलेल्या बंगला क्रमांक 34 वर प्रत्यक्षात मात्र कसलीही दुरुस्ती दिसलेली नाही दिल्लीत हा टाईप-8 बंगला अगदी ओस पडला आहे. हे पाहून स्पष्टपणे लक्षात येते की येथे अनेक वर्षांपासून कोणीही आलेले नाही. येथे ना साफसफाई झाली आणि ना दुरुस्ती. तेथे ना कोणताही कामगार दिसतो आणि ना गवंडी…यावरून हे स्पष्ट होते की बंगल्याची दुरुस्ती सुरू नाही. येथील गार्डनेही यास दुजोरा दिल आहे.
गृहनिर्माण आणि शहरी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार , ‘21-22 ऑगस्ट रोजी धनखड यांच्याकडून विभागाला बंगल्यासाठी अर्ज मिळाला होता. आधी चर्चा झाली होती की ते सरकारी बंगला मिळाल्यानंतरच सध्याचे सरकारी घर सोडतील. मात्र, त्यांनी सप्टेंबर 2025 मध्ये नवीन ठिकाण मिळाल्याशिवायच बंगला सोडला.ते त्यावेळी दाबवाखाली होते की नाही आम्हास माहिती नाही यापूर्वीही कोणत्याही माजी उपराष्ट्रपतीला बंगल्यासाठी 5-6 महिने वाट पाहावी लागली होती का? याबाबतचा तपशील विचार घेतला तर दोघांना एक महिन्याच्या आत बंगला मिळाला होता.इतरांना तातडीने मिळाले होते.
मग त्यांना बंगला मिळायला उशीर का होत आहे? हे प्रकरण खूप संवेदनशील आहे. कोणतीही माहिती लीक झाली, तर गोंधळ होईल. या प्रकरणात कोणालाही माहिती देऊ नये, असे विभागाला सक्तीने सांगण्यात आले आहे.’

