पुणे- : सरपंच सासूसह सासरच्यांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहितेने सोरतापवाडी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी उरुळी कांचन पोलिस ठाण्यामध्ये पती, सासू, सासरे, दीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.माहेरच्या लोकांनी लग्नात ५० तोळे सोने दिले, शाही लग्न लावून दिले, लग्नानंतर मुलीचा संसार टिकावा म्हणून ३५ लाख रोख रक्कमही दिली. तरीसुद्धा सासरच्या मंडळीकडून छळ सुरूच होता.
दीप्ती रोहन चौधरी असे मृत विवाहितेचे नाव आहे. पती रोहन कारभारी चौधरी, सरपंच सासू सुनीता कारभारी चौधरी, शिक्षक सासरे कारभारी चौधरी, दीर रोहित कारभारी चौधरी (सर्व रा. कडवस्ती, सोरतापवाडी, ता. हवेली) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विवाहितेची आई हेमलता बाळासाहेब मगर (वय ५०, रा. मगरपट्टा सिटी, हडपसर) यांनी तक्रार दिली आहे.
उरुळीकांचन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दीप्ती मगर आणि रोहन यांचे सात वर्षांपूर्वी लग्न झाले. लग्नात माहेरच्या मंडळींनी सासरच्यांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या. लग्नानंतर काही दिवसांतच दीप्तीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ सुरू केला. याविषयी दीप्तीने माहेरी तक्रार केली. मात्र, लेकीचा संसार नेटाने व्हावा, यासाठी कायम तिची समजूत घालून माहेरच्यांनी एकदा १० लाख रुपये रोख, गाडी घेण्यासाठी २५ लाख रुपये दिले होते. यानंतरही चारचाकी गाडी घेण्यासाठी सासरच्यांनी अजून पैसे मागणे सुरूच ठेवले होते. अखेर सासरच्या त्रासाला कंटाळून दीप्तीने शनिवारी रात्री आत्महत्या केली.
लग्नात 50 तोळे सोनं, 35 लाख कॅश देऊनही छळ; महिला सरपंचच्या सुनेनं संपवलं जीवन
Date:

