पुणे : भारतीय प्रजासत्ताकाचा ७७ वा वर्धापन दिन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)च्या आकुर्डी येथील मुख्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर राष्ट्रगीताच्या ध्वनीत परिसर दुमदुमला. पोलिस दलाच्यावतीने राष्ट्रध्वजाला सन्मानपूर्वक सलामी देण्यात आली.
या कार्यक्रमास अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, पोलिस अधीक्षक तथा मुख्य दक्षता अधिकारी अमोल झेंडे, सहआयुक्त (प्रशासन) रूपाली आवले-डंबे, महानगर मुख्य अभियंता रिनाज पठाण, सहआयुक्त (जमीन व मालमत्ता) पूनम मेहता, सहआयुक्त (अनधिकृत बांधकाम निर्मूलन) दीप्ती सूर्यवंशी-पाटील, मुख्य अभियंता शिवकुमार बागडी, वित्तीय नियंत्रक सविता नलावडे, महानगर नियोजनकार स्मिता कलकुटकी यांच्यासह पीएमआरडीएचे सर्व विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

