प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात …
नवी दिल्ली, 26 जानेवारी 2026
कर्तव्य पथावर आज झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या चित्ररथाची ही झलक. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या “भारत गाथा: श्रुती, कृती, दृष्टी” या शीर्षकाच्या चित्ररथावर भारताची समृद्ध कथाकथन परंपरा सादर करण्यात आली. प्राचीन मौखिक परंपरांपासून ते समकालीन माध्यमे आणि चित्रपटसृष्टीपर्यंतचा हा प्रवास दर्शवित, राष्ट्राच्या सांस्कृतिक उत्क्रांतीचे तसेच जागतिक दर्जाचे सामग्री-सामर्थ्य असलेला देश म्हणून उदयाचे प्रतिबिंब यात दिसून आले.
या चित्ररथावर भारताचे माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील नेतृत्व, नवोन्मेष आणि सांस्कृतिक राजशिष्टाचाराला पुढे नेणाऱ्या वेव्हज् या जागतिक मंचाचे महत्त्व ठळकपणे मांडण्यात आले. नागरी वारसा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुंदर मेळ साधत, 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात परंपरा आणि भविष्याभिमुख कथनांची सजीव स्वरूपात मांडणी करण्यात आली.






