नवी दिल्ली- केंद्र सरकारने रविवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 2026 या वर्षासाठी 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यात महाराष्ट्रातील एकूण 15 जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहे. दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्यासह पाच व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाले आहे.
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, झारखंडचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते शिबू सोरेन आणि गायिका अलका याज्ञिक यांच्यासह 13 व्यक्तींची पद्मभूषणसाठी निवड करण्यात आली आहे.
दुसरीकडे, क्रिकेटपटू रोहित शर्मा, अभिनेता आर. माधवन, पॅरा-अॅथलीट प्रवीण कुमार, महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर आणि हॉकीपटू सविता पुनिया यांच्यासह 113 व्यक्तींना पद्मश्री पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे.
पद्म पुरस्कार विजेत्यांपैकी 19 महिला आहेत. त्यापैकी सहा परदेशी/NRI/PIO/OCI श्रेणीतील आहेत. सोळा व्यक्तींना मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
महाराष्ट्रातील एकूण 15 जणांना पद्म पुरस्कार
महाराष्ट्रातून दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना पद्मविभूषण, तर अलका याज्ञिक, दिवंगत पीयूष पांडे(मरणोपरांत), उदय कोटक यांना पद्मभूषण तर क्रिकेटपटू रोहित शर्मा, अभिनेता आर माधवन, लोकनाट्य कलावंत रघुवीर खेडकर, डॉ. अर्मिडा फर्नांडिस, तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा व श्रीरंग लाड यांच्यासह 11 पद्मश्री पुरस्काराची घोषणा झाली आहे.
महाराष्ट्रातील पद्म विजेते
पद्मविभूषण
धर्मेंद सिंह देओल (मरणोत्तर ) (कला)
पद्मभूषण
अलका याज्ञिक (कला)
पीयूष पांडे (मरणोपरांत) (कला)
उदय कोटक (उद्योग)

