दक्षिण मध्य रेल्वेच्या महानिरीक्षक श्रीमती अरोमा सिंग ठाकूर यांची ‘विशिष्ट सेवेसाठीच्या राष्ट्रपती पदकासाठी निवड
नवीदिल्ली –
2026 च्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने, भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि रेल्वे सुरक्षा विशेष दलाच्या (आरपीएसएफ) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या समर्पित सेवेबद्दल, व्यावसायिक कौशल्याबद्दल आणि रेल्वे सुरक्षेतील आदर्शवत योगदानाबद्दल ‘विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक’ (पीएसएम) आणि ‘गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक’ (एमएसएम) प्रदान केले आहे.
विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक (पीएसएम)
श्रीमती अरोमा सिंग ठाकूर, महानिरीक्षक (इन्स्पेक्टर जनरल-आय जी) दक्षिण मध्य रेल्वे
गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (एमएसएम)
1 श्री उत्तम कुमार बंद्योपाध्याय, सहाय्यक सुरक्षा आयुक्त, दक्षिण मध्य रेल्वे
2. श्री कल्याण देओरी, सहाय्यक कमांडंट, रेल्वे सुरक्षा विशेष दल
3. श्री बलवान सिंग, निरीक्षक, उत्तर रेल्वे
4. श्री प्रफुल्ल चंद्र पांडा, निरीक्षक, पूर्व तटीय रेल्वे
5. श्री प्रकाश चरण दास, निरीक्षक, पूर्व तटीय रेल्वे
6. श्री मुकेश कुमार सोम, निरीक्षक, रेल्वे सुरक्षा विशेष दल
7. श्री पप्पाला श्रीनिवास राव, उपनिरीक्षक, पूर्व तटीय रेल्वे
8. श्री अन्वर हुसेन, उपनिरीक्षक, पश्चिम रेल्वे
9. श्री श्रीनिवास रावुला, उपनिरीक्षक, दक्षिण मध्य रेल्वे
10. श्री शिव लहरी मीना, उपनिरीक्षक, रेल्वे सुरक्षा विशेष दल
11. श्री दिक्काला वेंकट मुरली कृष्णा, सहाय्यक उपनिरीक्षक, पूर्व तटीय रेल्वे
12. श्री संजीव कुमार, सहाय्यक उपनिरीक्षक, उत्तर रेल्वे
13. श्री महेश्वरा रेड्डी कर्नाटी, हेड कॉन्स्टेबल, दक्षिण मध्य रेल्वे
14. श्री सी. इलैया भारती, हेड कॉन्स्टेबल, दक्षिण रेल्वे
15. श्री मोहम्मद रफीक, कॉन्स्टेबल/धोबी, रेल्वे सुरक्षा विशेष दल
पीएसएम हे पदक विशेषतः उल्लेखनीय आणि गौरवशाली सेवेच्या नोंदीसाठी दिले जाते, तर एमएसएम हे पदक कौशल्य, प्रसंगावधान आणि कर्तव्यनिष्ठेने पार पाडलेल्या मौल्यवान सेवेबद्दल दिले जाते.
हे पुरस्कार वर्षातून दोनदा, म्हणजेच प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी) आणि स्वातंत्र्य दिन (15 ऑगस्ट) रोजी प्रदान केले जातात. भारतीय रेल्वेच्या संरक्षणाची सर्वोच्च मानके राखण्यासाठी आरपीएफ/ आरपीएसएफ कर्मचाऱ्यांना सन्मानित करणे आणि त्यांना प्रेरित करणे हा यामागचा उद्देश आहे.

