हवेली: हवेली जिल्हा परिषद निवडणूक कार्यालयाने 6 जिलापरिषद गट आणि 12 पंचायत समिती गण या आगामी निवडणुकीसाठी 100 टक्के मतदानाचे लक्ष्य साधण्यासाठी ‘मिशन 100’ हे विशेष अभियान सुरू केले आहे. यामध्ये नागरिकांच्या मतदानातील सहभाग वाढावा व सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा, हा उद्देश ठेवण्यात आला आहे.
खडकवासला निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने आणि तहसीलदार तृप्ती कोलते, अर्चना निकम,नायब तहसीलदार सचिन आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप पथकाचे प्रमुख हेमंतकुमार खाडे आणि त्यांच्या टीमद्वारे मतदार जागृतीसाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत.
‘मिशन 100’ च्या माध्यमातून विविध ठिकाणी मतदार जागृती कार्यक्रमाचे आयोजन, शाळा व महाविद्यालयांमध्ये जनजागृती, तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे मतदानाचे महत्त्व पटवून देण्याचे काम केले जात आहे. सोबतच ‘मिशन डेमोक्रसी ’ हा उपक्रम देखील सुरू आहे, ज्याद्वारे गावांमध्ये प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया आणि जागृती कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.
हे विशेष अभियान 100 टक्के मतदानाची उद्दिष्टपूर्ती साधण्यासाठी प्रभावी ठरेल, अशी अपेक्षा हवेली जिल्हा परिषद निवडणूक कार्यालयाने व्यक्त केली आहे.
हवेली जिल्हा परिषद निवडणूक कार्यालयाचे ‘मिशन 100’: 100 टक्के मतदानासाठी विशेष अभियान
Date:

