पुणे- EVM मशीन फ्रॉड, आणि निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचे कायदेशीर हक्क डावलणे, विशिष्ट उमेदवार निवडून आणण्यासाठी षडयंत्र राबविणे अशी कारस्थाने निवडणूक अधिकाऱ्याने केली आणि त्यास प्रतिबंध केला म्हणून आपल्यावरच सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला असा आरोप रुपाली पाटील यांनी केला. आहे.
रुपाली पाटील यांनी म्हटले आहे की, कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय निवडणूक अधिकारी श्री निलेश काळे यांनी पोलिसांना हाताशी धरून बोगस व खोटा गुन्हा दाखल केला आहे.मी उमदेवार असल्याने मी व उमेदवार जाळीच्या आत मध्ये हवे होते,काळे यांनी स्वतः परस्पर evm मशीन बदल ल्या उलट पोलिसांनी तातडीने त्यांच्या गुन्हा दाखल करायचा होता. षडयंत्र कोणाचे तरी ऐकून evm मशीन विरोधातील आवाज दाबण्यासाठी पोलिसांना हाताशी धरून खोटा गुन्हा दाखल केला. माझा न्यायालयावर विश्वास आहे ह्या खोट्या गुन्ह्याचा ,निवडणूक अधिकारीचा त्यांना मदत करणाऱ्या पोलिसांचा बुरखा मी संविधान कायद्याने फाडेल.
एक तर मतदारांचेही काही हक्क आहेत , मतदारांनी EVM वर मतदान करायचे कि मतपत्रिकेवर करायचे याचे स्वातंत्र्य मतदारांना देणे गरजेचे आहे. पण सरकार सांगेल तेच साधन आणि मत प्रक्रिया मतदारांवर लादणे कितपत योग्य आहे. मतपत्रिकेवर कोणाला मत पडलेय हे स्पष्ट दिसत होते .प्रत्येक मतपत्रिका पाहायला मिळत होती . इथे मशीन थेट एकूण आकडे दाखवते , तेही दूरवरून मध्ये जाळ्या लावून . पारदर्शक कारभाराची अपेक्षा मतदारांना आणि उमेदव्रांना असतेच . मग अधिकाऱ्यांनी त्याचे कडे दुर्लक्ष करून सरार्स मनमानी का करावी , पारदर्शक कारभार का करू नये असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

