पुणे:पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकी नंतर पहिली सभा म्हणजेच महापौर, उपमहापौर यांची निवडणूक घेणे याबाबत तारिख, वेळ आणि सभेच्या अध्यक्षस्थानी पिठासीन अधिकारी यांच्या निश्चिती करिता विभागीय आयुक्त यांचेकडे पत्र पाठविण्यात आले होते. विभागीय आयुक्त यांचेशी झालेल्या चर्चेनुसार. महापौर, उपमहापौर यांची निवडणूक घेणे याकरिता शुक्रवार, दि. ६ फेब्रुवारी २०२६ ही तारिख निश्चित करण्यात आलेली असून, ही पहिली विशेष सभा शुक्रवार, दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी, सकाळी ११.०० (अकरा) वाजता घेण्यात येईल. याबाबतचा कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येईल.असे महापलिका आयुक्त नवल किशोर राम यांनी कळविले आहे.
पुण्याचे महापौर,उपमहापौर 6 फेब्रुवारीला निवडणार
Date:

