§ झेड.के.डब्ल्यू ग्रुप जीएमबीएचचे सीईओ श्री. वॉन योंग ह्वांग यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथील उत्पादन सुविधेचे उद्घाटन संपन्न.
पुणे, 23 जानेवारी, 2026: पॅसेंजर वाहने, व्यावसायिक वाहने, ऑफ-रोड वाहने, दुचाकी आणि तीनचाकी वाहनांसह विविध प्रकारच्या वाहनांसाठी आवश्यक ओईएम्स (“मूळ उपकरण उत्पादक”) ऑटोमोटिव्ह लाइटिंग उत्पादने आणि अन्य घटकांचे एक प्रमुख उत्पादक तसेच जागतिक पुरवठादार असलेल्या निओलाइट झेडकेडब्ल्यू लाइटिंग्स लिमिटेडने महाराष्ट्रातील पुणे येथे आपल्या नवीन उत्पादन सुविधेचे आज उद्घाटन केले.
डिसेंबर 2025 मध्ये कार्यान्वित झालेला हा नवीन प्रकल्प मुंबई-पुणे-नाशिक-औरंगाबादच्या प्रमुख ऑटोमोटिव्ह क्लस्टरच्या अगदी जवळ आहे. यामुळे कंपनीला अधिक जलद, उत्तम इन्व्हेंटरी व्यवस्थापन करता तर येतेच. पण त्यासोबत जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीची एमजी मोटर इंडिया), स्टेलेंटिस ऑटोमोबाईल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, व्हीई कमर्शियल व्हेइकल्स लिमिटेड, डेमलर इंडिया कमर्शियल व्हेइकल्स प्रायव्हेट लिमिटेड, इसुझू मोटर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, टाटा मोटर्स लिमिटेड आणि पियाजिओ व्हेइकल्स प्रायव्हेट लिमिटेड यांसारख्या प्रत्येक ग्राहकाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक लक्ष देणे शक्य होते.
उत्पादन सुविधांव्यतिरिक्त, निओलाइट झेडकेडब्ल्यूने एक स्वतंत्र डिझाइन केंद्र स्थापन केले आहे, जे आधुनिक डिझाइन साधने आणि सिम्युलेशन सॉफ्टवेअर, थ्रीडी मॉडेलिंग, ऑप्टिकल डिझाइन, प्रोटोटाइपिंग अशा सुविधांनी सज्ज आहे. हे डिझाइन केंद्र आमच्या कंपनीच्या अंतर्गत उत्पादन विकास क्षमता वाढविण्यात, उत्पादन प्रत्यक्षात बाजारात आणण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यात आणि आमची उत्पादने जागतिक कार्यक्षमता तसेच अन्य नियामक मानकांची पूर्तता करतील याची खात्री करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
या प्रसंगी झेडकेडब्ल्यू ग्रुप जीएमबीएचचे सीईओ श्री. वॉन योंग ह्वांग म्हणाले, “जागतिक ऑटोमोटिव्ह उद्योगासाठी भारत एक धोरणात्मक बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे. निओलाइट झेडकेडब्ल्यूचा पुण्यातील विस्तार म्हणजे भविष्यातील ऑटोमोटिव्ह लाइटिंग सोल्यूशन्सना पुढे नेण्यासाठी टाकलेले एक सकारात्मक पाऊल आहे. तंत्रज्ञान आणि नावीन्य यातील सातत्यपूर्ण सहकार्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
निओलाइट झेडकेडब्ल्यू लाइटिंग्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, श्री. राजेश जैन म्हणाले, “आमचा नवीन पुणे प्रकल्प हा आमच्या ग्राहकांच्या आणि निओलाइट झेडकेडब्ल्यूच्या प्रगतीच्या पुढील टप्प्याला पाठिंबा देण्यासाठी तसेच क्षमता, तंत्रज्ञान आणि प्रतिभेमध्ये गुंतवणूक करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. या सुविधेच्या माध्यमातून ग्राहकांच्या गरजांना वेळेवर प्रतिसाद देण्यासाठी, ऑटोमोटिव्ह लाइटिंगमध्ये नावीन्य आणण्यासाठी आणि या प्रदेशात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आम्ही अधिक चांगल्या स्थितीत आहोत. यापुढील आमचे पुढील लक्ष्य कांचीपुरम येथील आमचा प्रकल्प सुरू करणे, हे असेल आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेत आहोत.”
“पुण्यातील ही सुविधा मोल्डिंग, सरफेस ट्रीटमेंट आणि असेंब्लीसह ऑटोमोटिव्ह लाइटिंग उत्पादने आणि अन्य घटकांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी डिझाइन केली आहे. शिवाय, विद्युतीकरण आणि टिकाऊपणाच्या दिशेने होत असलेल्या बदलाच्या अनुषंगाने, आम्ही इलेक्ट्रिक वाहनांवर लक्ष केंद्रित करणारी काही लाइटिंग उत्पादने देखील सादर करतो. त्याच वेळी, आमचा पोर्टफोलिओ देखील पॉवरट्रेन एगनॉइस्टिक आहे, जो इलेक्ट्रिक वाहनांसह अन्य प्रकारची इंजिन असलेल्या वाहनांसाठी देखील उपयुक्त आहे,” असे निओलाइट झेडकेडब्ल्यूचे सीईओ श्री. राजेश सोनी म्हणाले.

