पुणे -पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ०६ वेगवेगळ्या ठिकाणी छापा मारून ८,३२,९६०/-रु किंमतीचे प्रतिबंधीत ई- सिगारेट (वेप) व तबांखुजन्य हुक्का फ्लेवर पकडले आहेत.
अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी पुणे शहरात प्रतिबंधीत ई सिगारेट (वेप) आणि तबांखुजन्य हुक्का फ्लेवर याचा साठा करून अवैध विक्री करणा-या दुकानदारावर धडक कारवाई सुरु केली आहे . या कारवाई मध्ये लष्कर पोलीस स्टेशन व कोरेगांवपार्क पोलीस स्टेशन येथे इलेक्ट्रॉनिक सिगारेट उत्पादन आयात निर्यात वाहतुक विक्री साठवणुक व जाहिरात प्रतिबंध अधिनियम २०१९ चे कलम ७ च ८ प्रमाणे, एकुण ०३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच कोथरुड पोलीस स्टेशन आणि लष्कर पोलीस स्टेशन येथे प्रतिबंधीत अवैध रित्या तबांखुजन्य हुक्का फ्लेवर विक्री करणाऱ्या दुकानदारावर एकुण ०३ खटले दाखल करण्यात आले . या मध्ये ८,३२,९६०/-रु किमतीचे २९७ ई- सिगारेट (वेप), तसेच ८९५ तबांखुजन्य हुक्का फ्लेवर जप्त करण्यात आले असून १) हुसेन अब्दुल रहेमान वय २५ वर्षे रा. लेन नं ६ कोरेगाव पार्क पुणे २) हसन शेख वय ४२ रा एम जी रोड कॅम्प पुणे ३) अब्दुल इस्माईल जाबीर वय २८ रा. मोलोदिना रोड, कॅम्प पुणे यांना पकडण्यात आले आहे.
हि कामगिरी अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा पकंज देशमुख, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा निखील पिंगळे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा २ राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली व सुचनेनुसार पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, अनिल सुरवसे, पोलीस उप निरीक्षक अस्मिता लाड, व पोलीस अंमलदार, राजस शेख, संदिप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, सुनिल महाडीक, गणेश गोसावी, अमोल जगताप, संदिप देवकाते, देविदास वांढरे, दिनेश बास्टेवाड, महेश बोराडे, शुभांगी म्हाळसेकर यांनी केली.
साडेआठ लाखाची E सिगारेट आणि हुक्का फ्लेवर पकडले , तिघांना अटक
Date:

