पुणे- Girndr या समलिंगी डेटिंग अँपवरुन संपर्क करुन लोंकांना लुटणारी टोळी पुण्यातील कोंढवा पोलिसांनी पकडली आहे.
या अॅपवरुन संपर्क करुन डेटिंग करीता रात्री मोकळ्या मैदानामध्ये संबधितांना बोलावुन लोखंडी हत्याराचा धाक दाखवुन त्याचे मोबाईल फोन, सोन्याचे चैन, अंगठी, एटीएम वरुन पैसे असा मुद्देमाल जबरीने चोरी केल्याच्या गुन्ह्याचा तपास करताना या टोळीला पोलिसांनी पकडले आहे.
दाखल गुन्हयाचे अनुषंगाने पोलीस स्टेशनकडील तपास पथक अधिकारी व अंमलदार आरोपीचा शोध घेत असताना सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल नंबरवरुन आरोपीची नावे शोधून पोलीस अंमलदार पुष्पेंद्र चव्हाण व सुहास मोरे यांना गोपनिय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीप्रमाणे संबधित WANTED आरोपी राहिल शेख याच्या घराचे जवळ ए.जे कंपनी जवळ, डी मार्टचे पुढे, सोमजी, कोंढवा बु.पुणे येथुन रोहील अकिल शेख, वय १९ वर्षे, याच्यासह २) नुहान नईम शेख वय १८ वर्षे रा. प्लॅट नं २०२, इसाक टॉवर, गल्ली नं ०२ लक्ष्मीनगर, कोंढवा बु.पुणे ३) शाहिद शाहनुर मोमीन वय२५ वर्षे, रा. बालाजी बिल्डींग, दुसरा मजला, संतोष नगर गल्ली नं.०३ कात्रज पुणे ४) ईशान निसार शेख वय २५ वर्षे रा. मातोश्री बिल्डींग, लेन नं. ०१ अंजलीनगर, कात्रज पुणे ५) वाहीद दस्तगीर शेख, वय १८ वर्षे, धंदा फॅब्रीकेशन, रा बिस्मील्ला मस्जिदचे जवळ, स.नं.४२ कोंढवा खुर्द, पुणे यांना अटक करुन पोलीस उपनिरिक्षक रविंद्र गावडे यांनी त्याचेकडे अधिक तपास केला असता अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या आरोपींकडून जबरदस्तीने चोरी केलेले ०३ मोबाईल फोन, लोखंडी कोयता व आरोपीतांनी वापरलेल्या २ दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. .
हि कारवाई अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग मनोज पाटील. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-५ राजलक्ष्मी शिवणकर, सपोआ वानवडी विभाग कुमार घाडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप, यांचे मार्गदर्शनाखाली व सुचनेनुसार तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरिक्षक रविंद्र गावडे व पोलीस अंमलदार निलेश देसाई, गोरखनाथ चिनके पुष्पेंद्र चव्हाण, रशिदशेख, सुहास मोर, अमित सुर्यवंशी, सुरज शुक्ला, संतोष बनसुडे, रियाज पटेल, केशव हिरवे, शाहिद राजपुत, प्रशांत खाडे, राहुल शेलार यांनी केली.
grindr app समलिंगी डेटिंग अँपवरुन संपर्क करुन लोंकांना लुटणारी टोळी पकडली
Date:

