बदलापूरच्या घटनेने राज्याच्या अब्रुची लक्तरे पुन्हा वेशीवर टांगली, लोकांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका, महागात पडेल: हर्षवर्धन सपकाळ

Date:

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला लाभलेले सर्वात निष्क्रीय, अकार्यक्षम व बेजबाबदार मुख्यमंत्री, झेपत नाही तर गृहमंत्रीपद सोडा.

मुंबई, दि. २३ जानेवारी २०२६

बदलापूरमध्ये एका लहान मुलीवरील लैंगिक अत्याचाराची घटना संताप आणणारी व शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या गुन्हेगारांनी उच्छाद मांडला असून सरकार व कायदा हतबल झाल्याचे दिसत आहेत. राज्यकर्त्यांमध्ये गुन्हेगारांवर कारवाई करण्याची धमकच राहिलेली नाही. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राला लाभलेले आतापर्यंतचे सर्वात निष्क्रीय, अकार्यक्षम व बेजबाबदार मुख्यमंत्री आहेत, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, चार-पाच वर्षांच्या मुलींवर अत्याचार होत असताना राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री यांना झोप कशी लागते. दीड वर्षापूर्वी बदलापुरात लहान शाळकरी मुलींवर अशीच घटना घडली होती पण सरकारने या प्रकरणातील महत्वाच्या आरोपींना मोकळे सोडले. जनतेने रस्तावर उतरून तीव्र आंदोलन केल्यानंतर सरकारला खडबडून जाग आली होती पण पुढे या प्रकरणाचे काय झाले, हे राज्याने पाहिले आहे. भाजपा व संघाशी संबंधित शाळेत घडलेल्या या घटनेत शाळेच्या अध्यक्ष व सचिवावर कारवाई केली नाही. या गुन्ह्यात शाळेचा सचिव तुषार आपटेवर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल असताना भाजपाने त्याला स्विकृत नगरसेवक केले होते. प्रशासन कामच करत नाही त्यामुळे गुन्हेगारांचे मनौधैर्य वाढले आहे. काल बदलापुरात झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी सरकारने कठोर कारवाई करावी, अन्यथा जनता रस्त्यावर उतरेल, असा इशाराही सपकाळ यांनी दिला आहे.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजावारा उडलेला आहे. मंत्री भरत गोगावलेंचा मुलगा एका प्रकरणात फरार होतो, तो वडिल मंत्र्यांच्या संपर्कात असतो पण पोलीस मात्र त्याच्यापर्यंत पोहचत नाहीत. असे मंत्री मंत्रीमंडळात आहेत, मुख्यमंत्री एवढे हतबल का आहेत? असा प्रश्न उच्च न्यायालयाला विचारावा लागतो. सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांना भाजपाच्या माजी खासदाराच्या अत्याचाराला कंटाळून आत्महत्या करावी लागली पण या प्रकरणातही कारवाई झाली नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तर कसलीच चौकशी न करता क्लिन चिट देऊन टाकली. अंकिता भंडारी, उन्नाव बलात्कार, महिला कुस्ती खेळाडूंवरील लैंगिक अत्याचार अशा अनेक प्रकरणात दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपाशी संबंधित लोक असल्याचे स्पष्ट झालेले आहे पण कारवाई मात्र केली जात नाही. भाजपा महायुती सरकारमध्ये आका, खोके, वाळू माफिया, ड्रग्ज माफिया, लँड माफिया यांना मोकळे रान आहे. महिला व मुलींची सुरक्षा तर रामभरोसे आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बदलापूर स्कूल व्हॅन अत्याचार प्रकरण:तपासादरम्यान समोर आलेली माहिती आणखी गंभीर

मुंबई- बदलापूर पश्चिम परिसरात स्कूल व्हॅनमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर...

शाळेच्या मुख्याध्यापिकेने तक्रारीकडे दुर्लक्ष करत बस चालकाचीच बाजू घेतल्याचा आरोप

बदलापूर- येथे पुन्हा एकदा माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर...

राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा:गुन्हेगारांना सत्ताधाऱ्यांचे अभय, वाढत्या गुन्हेगारीला सरकारच जबाबदार – सतेज पाटील

मुंबई-राज्यामध्ये राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे, हे वाढलेल्या...

बदलापुरात 4 वर्षांच्या मुलीवर स्कूल व्हॅन चालकाकडून अत्याचार:आरोपीस अटक

मुंबई-अक्षय शिंदे प्रकरणाच्या जखमा अद्याप ताज्या असतानाच, बदलापूर शहर...