पुणे- ३० ते ३१ जानेवारी २०२६ रोजी नवनिर्वाचित सदस्यांची बैठक घेऊन महापौर व उपमहापौर निवडण्याच्या सूचना महापालिकांना करण्यात आल्या असल्याच्या वृताने राजकीय वर्तुळात वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. पहा कसा असेल कार्यक्रम…
बृहन्मुंबई महानगरपालिका सह सर्व महानगरपालिका महापौर पदाचे आरक्षण २२ तारखेला सोडत काढून निश्चित करण्यात आले. आज दिनांक २३ रोजी आरक्षण जाहिर झाल्यानंतर नगर सचिवांनी महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणुक घेण्याकरीता निर्वाचित सदस्यांची प्रथम बैठक बोलावण्यासाठी तारीख व वेळ निश्चितीसाठी संबंधित विभागीय आयुक्त यांचेकडे प्रस्ताव सादर कारायचा आहे.
२४.०१.२०२६ ते २५.०१.२०२६
विभागीय आयुक्त यांनी महानगरपालिकेच्या प्रथम सभेची तारीख व पिठासिन अधिकारी निश्चित करावेत व सभेची सुचना स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करायाची आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका
२७.०१.२०२६ ते २८.०१.२०२६
महापौर/उपमहापौर पदासाठी ईच्छुक सदस्य नाम निर्देशपत्र महानगरपालिका सचिवांना सादर करतील.
सर्व महानगरपालिका (बृहन्मुंबई महानगरपालिका वगळून)
२७.०१.२०२६ ते२ ८.०१.२०२६
महापौर/उपमहापौर पदासाठी ईच्छुक सदस्य नाम निर्देशपत्र महानगरपालिका सचिवांना सादर करतील.
बृहन्मुंबई महानगरपालिका
३०.०१.२०२६ ते ३१.०१.२०२६
महापौर व उपमहापौर पदासाठी नवनिर्वाचित सदस्यांची बैठक घेऊन महापौर व उपमहापौर निवडण्यात यावेत.
सर्व महानगरपालिका (बृहन्मुंबई महानगरपालिका वगळून)
३०.०१.२०२६ ते ३१.०१.२०२६
महापौर व उपमहापौर पदासाठी नवनिर्वाचित सदस्यांची बैठक घेऊन महापौर व उपमहापौर निवडण्यात यावेत.
३० ते ३१ जानेवारी नवनिर्वाचित सदस्यांची बैठक घेऊन महापौर व उपमहापौर निवडणार
Date: