मुंबई / दुबई | : जागतिक व्यापार, गुंतवणूक आणि उद्योजकतेसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ‘महाबिझ 2026’ या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक परिषदेचे अधिकृत कार्यक्रम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. हे दोन दिवसीय संमेलन ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी २०२६ रोजी दुबई येथे आयोजित करण्यात येणार आहे.
संमेलनाचा पहिला दिवस ३१ जानेवारी २०२६ रोजी Al Habtoor Polo Resort, Dubai येथे होणार असून, यामध्ये संरचित नेटवर्किंग, नेतृत्वपर भाषणे, विविध उद्योग क्षेत्रांवरील सत्रे तसेच भारत, यूएई व आफ्रिकेतील उदयोन्मुख व्यावसायिक संधींवर चर्चा होणार आहे.
१ फेब्रुवारी २०२६ रोजी Atlantis, The Palm, Dubai येथे होणाऱ्या दुसऱ्या दिवशी ‘महाबिझ २०२६’चे औपचारिक उद्घाटन, मान्यवरांची कीनोट भाषणे, जागतिक ब्रँड सादरीकरणे आणि ‘महाराष्ट्र इन दुबई’ हा भव्य समारोप कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.
याबाबत बोलताना डॉ. सुनील व्ही. मांजरेकर, अध्यक्ष – GMBF ग्लोबल म्हणाले, “महाबिझ २०२६ चे वेळापत्रक अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने आखण्यात आले असून, यातून उद्योग, उद्योजक आणि गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष व्यावसायिक लाभ मिळेल, हा आमचा ठाम विश्वास आहे. जगभरातून २६ देशांतील मान्यवर उद्योगपतींची या उपस्थिती उद्योग संमेलनाला लाभणार असून, महाराष्ट्रासाठी / महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी हे विश्वसंमेलन विशेष ठरणार आहे.”
याबाबत बोलताना श्रीपाद कुलकर्णी, संस्थापक व अध्यक्ष – BBNG (महा बिझ २०२६ आयोजक) म्हणाले, “महा बिझ २०२६ म्हणजे केवळ परिषद नाही, तर संपर्कांचे रूपांतर प्रत्यक्ष करार, गुंतवणूक आणि दीर्घकालीन भागीदारीत करणारा जागतिक मंच आहे.”
‘Contacts to Contracts’ या संकल्पनेवर आधारित महाबिझ २०२६ हे महाराष्ट्र व भारतासाठी जागतिक व्यापाराच्या नव्या दालानांची दारे उघडणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे.

