एमआयटी डब्ल्यूपीयूत ‘मराठी भाषा आणि बोली’ विषयावर परिसंवाद २४ जानेवारी रोजी

Date:

पुणे : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (डब्ल्यूपीयू) च्या स्कूल ऑफ एज्युकेशन यांच्या तर्फे ‘मराठी भाषा आणि बोली’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार दि. २४ जानेवारी रोजी दुपारी ३ वा. कोथरुड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या ज्ञानेश्वर सभागृह संपन्न होणार आहे. अशी माहिती डब्ल्यूपीयूच्या स्कूल ऑफ एज्युकेशन विभागातर्फे देण्यात आली आहे.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड आणि कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनात परिसंवादाचे आयोजन होत आहे.
परिसंवादात ‘भाषा, बोली आणि आपण’ या विषयावर सुशील धसकटे, ‘भाषा, बोली आणि वृत्तपत्र’ या वर उद्धव धुमाळे आणि धनंजय भावलेकर हे ‘भाषा, बोली आणि चित्रपट’ या विषयावर आपले विचार व्यक्त करतील.
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव डॉ. शामकांत देवरे व डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. अध्यक्षस्थानी स्कूल ऑफ एज्युकेशनच्या प्राचार्य डॉ. शालिनी टोणपे असतील. तसेच स्कूल ऑफ लिबरल आर्टसचे अधिष्ठाता डॉ. विशाल घुले हे उपस्थित राहतील.
कार्यक्रमाचे समन्वयक महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे संपादकीय सहायक सागर शंकर आणि स्कूल ऑफ एज्युकेशनचे सहायक प्राध्यापक प्रा. प्रिया काळे आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच रेड्डी, ओबेरॉय यांना डी.लिट:टिळक विद्यापीठाचा 44 वा पदवीप्रदान सोहळा

पुणे- टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत,...

आला उन्हाळा; आपले आरोग्य सांभाळा

सध्या सर्वत्र तापमान वाढत असून, उष्णतेच्या लाटेकडे दुर्लक्ष करू...