पुणे-
पुणे शहराला सायकलींचे शहर ही जुनी ओळख पुन्हा निर्माण करून देण्यासाठी पुण्यामध्ये एकीकडे ‘पुणे ग्रँड टूर’ सारखी आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा चालू असताना सायकल क्लब, पुणे महानगरपालिका यांच्यामार्फत आणखी एक पराक्रमी मोहीम हाती घेण्यात आली आहे. सायकल क्लब पुणे महानगरपालिका आज दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी पुणे महानगरपालिकेच्या प्रांगणातून छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन सायकल वरून गुजरात राज्यामधील लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांचा पुतळा असलेले स्टॅच्यू ऑफ युनिटी या जगप्रसिद्ध स्थळाला भेट देण्यासाठी आज पहाटे ४.३० वाजता निघाले आहेत.
या धाडसी मोहिमेत १२ सायकल स्वार सहभागी झाले आहेत.
सुनील अहिरे
उमाकांत डिग्गीकर
विशाल पाटील
अभिमन्यू गाडे
संदीप आमले
महेश करांडे
नितीन देडगे
प्रशांत गवळी
संतोष असवले
अनिल चाटे
अजय नाईक
जयसिंग गायकवाड
श्री मारटकर
अशी सहभागी झालेल्या अधिकारी व कर्मचारी सायकल स्वारांची नावे आहेत.
रॅलीचे एकूण अंतर सुमारे ५४० किलोमीटर आहे. दररोज साधारणपणे १५० किलोमीटर सायकलिंग करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या रॅलीचा मार्ग पुणे – संगमनेर – सापुतरा – झंखवाव – स्टॅच्यू ऑफ युनिटी असा असून, मार्गातील विविध ठिकाणी थांबून नागरिकांमध्ये पर्यावरण संरक्षण, पाणी बचत, प्रदूषणमुक्त जीवनशैली याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. वाढते प्रदूषण, पाण्याची कमतरता व हवामान बदल याच्या पार्श्वभूमीवर सायकलचा वापर वाढावा व पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारली जावी, हाच या रॅलीचा मुख्य उद्देश आहे.
ही धाडसी मोहीम स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पोहचेल आणि तेथेच या मोहिमेची सांगता होईल.
या सायकल रॅलीचे घोषवाक्य आहे —
“सायकल चालवा – पर्यावरण वाचवा”

