बजाज पुणे ग्रँड टूर २०२६: ल्यूक मडग्वेचे वर्चस्व कायम; ‘मराठा हेरिटेज सर्किट’मध्ये सलग दुसरा विजय

Date:

▪️ आमदार भीमराव तापकीर, मनपा आयुक्त नवलकिशोर राम यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव

पुणे, दि. २१ : पुण्यात आयोजित ऐतिहासिक ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेने दुसऱ्या दिवशी अधिकच थरारक वळण घेतले. ‘मराठा हेरिटेज सर्किट’ या दुसऱ्या टप्प्यात चीनच्या ‘ली निंग स्टार’ संघाचा सायकलपटू ल्यूक मडग्वे याने सलग दुसरा विजय मिळवत ‘यलो जर्सी’वरील आपले वर्चस्व कायम राखले. या वेळी आमदार भीमराव तापकीर आणि पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम आदी मान्यवरांच्या हस्ते यशस्वी सायकलपटूंचा गौरव करण्यात आला.

आजचा दुसरा टप्पा ‘मराठा हेरिटेज सर्किट’ अंतर्गत १०५.३ किलोमीटरचा होता. पुण्याच्या कॅम्प परिसरातील लेडीज क्लब येथून दुपारी १२.३० वाजता शर्यतीला प्रारंभ झाला, तर सिंहगड रोडवरील नांदेड सिटी येथे समारोप झाला. डोंगराळ भूभाग, तीव्र चढ-उतार आणि वळणावळणाचे रस्ते यामुळे हा टप्पा सायकलपटूंच्या ताकद, तंत्र आणि सहनशक्तीची कसोटी पाहणारा ठरला.

ल्यूक मडग्वे याने ०२:३१:४९ या वेळेत शर्यत पूर्ण करत प्रथम क्रमांक पटकावला. थायलंडच्या ‘रुजाई इन्शुरन्स’ संघाचा अ‍ॅलन कार्टर बेटल्स दुसऱ्या, तर बेल्जियमचा यॉर्बन लॉरिसेन तिसऱ्या क्रमांकावर राहिला.

दुसऱ्या टप्प्यानंतर विविध श्रेणींतील जर्सी विजेते पुढीलप्रमाणे ठरले आहेत: यलो जर्सी (एकूण आघाडी) : ल्यूक मडग्वे (चीन), पोल्का डॉट जर्सी (किंग ऑफ द माउंटेन्स) : स्टीफन बेनेटन (गुआम), ऑरेंज जर्सी (सर्वोत्कृष्ट आशियाई सायकलपटू) : जंबालजाम्ट्स सेनबायर (मंगोलिया/स्पेन), व्हाईट जर्सी (सर्वोत्कृष्ट युवा सायकलपटू) : तिजसेन विगो (नेदरलँड्स), तर ब्ल्यू जर्सी (भारताचा सर्वोत्तम सायकलपटू) : मनव सरदा (इंडियन डेव्हलपमेंट टीम).

ही स्पर्धा भारतातील सायकलिंग क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरत असून UCI 2.2 श्रेणीतील ही देशातील पहिली पाच दिवसांची मल्टि-स्टेज ‘कॉन्टिनेंटल सायकल रेस’ आहे. पाच खंडांतील ३५ देशांचे १७१ आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकलपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. एकूण ४३७ किलोमीटरचा मार्ग पुणे जिल्ह्यातील ९ तालुके आणि १५० गावांतून जात असून, अवघ्या ७५ दिवसांत जागतिक दर्जाच्या या स्पर्धेसाठी रस्ते व पायाभूत सुविधा अद्ययावत करण्यात आल्या आहेत.

विजयानंतर बोलताना ल्यूक मडग्वे म्हणाला, “आजचा दिवस अत्यंत उष्ण होता आणि चढाव खूप आव्हानात्मक होते; मात्र संघातील सहकाऱ्यांच्या उत्तम साथीतून हा विजय मिळवता आला.”

स्पर्धेचा तिसरा टप्पा उद्या, २२ जानेवारी २०२६ रोजी ‘वेस्टर्न घाट गेटवे’ अंतर्गत पुरंदर ते बारामती (१३४ किमी) दरम्यान पार पडणार असून, या टप्प्यात पुणेकरांना जागतिक दर्जाच्या सायकलपटूंच्या वेगवान आणि थरारक कामगिरीचा अनुभव घेता येणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अपघाती निधन झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसास १० लाख रुपये विम्याची रक्कम प्राप्त

पुणे- पुणे महापालिकेच्या जागरूकतेमुळे अपघाती निधन झालेल्या कंत्राटी...

‘बजाज पुणे ग्रँड टूर’च्या दुसऱ्या टप्प्याचा दिमाखदार प्रारंभ

मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची उपस्थिती पुणे शहर,...