पुणे, दि. २१ जानेवारी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे तर्फे घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी–मार्च २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत. इयत्ता १२ वीची परीक्षा दि. १० फेब्रुवारी २०२६ ते दि. १८ मार्च २०२६ दरम्यान, तर इयत्ता १० वीची परीक्षा दि. २० फेब्रुवारी ते दि. १८ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहे.
परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना अभ्यास व परीक्षेसंदर्भात काही अडचणी किंवा समस्या निर्माण झाल्यास त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच तणावमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुणे विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रातील पुणे, अहिल्यानगर व सोलापूर जिल्ह्यांमध्ये तज्ञ समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे विभागीय मंडळाच्या सचिव डॉ. मिनाक्षी राऊत यांनी दिली आहे.
विद्यार्थी व पालकांनी कोणत्याही अडचणीसाठी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत खालील भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तज्ञ समुपदेशक (पुणे)
योगीनी पाटील – ९९६०६४४४११
आशुमती देशपांडे – ७९७२५७३७४२
वृषाली आठवले – ९८३४०८४५९
तज्ञ समुपदेशक (बारामती)
श्रेया दिघे – ९३५९९७८३१५
तज्ञ समुपदेशक (अहिल्यानगर)
सुनील मोरे – ८१६९२०२२१४
सुजित भोसले – ९३७१६६१२५५
विजया कुलकर्णी – ७२०८४२९३८१
तज्ञ समुपदेशक (सोलापूर)
निकिता गडाख – ७७०९१५६०६८
सुजाता शिंदे – ८४२११५०५२८
वरदा रानडे – ९४०४७८३९९६
तसेच परीक्षा काळात मंडळासंबंधी माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत उपलब्ध असून,
इयत्ता १० वी साठी – ९४२३०४२६२७
इयत्ता १२ वी साठी – ७०३८७५२९७२
या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
०००००
इ. १० वी व १२ वी परीक्षा कालावधीमध्ये समुपदेशकांची नियुक्ती
Date:

