या मॉडेलमुळे मुंबई, हैदराबाद तसेच टियर-2 शहरांमध्ये जलद विस्तार शक्य झाला असून, पारंपरिक मॉडेलच्या तुलनेत जमीनमालक भागीदारांना तब्बल 30% अधिक परतावा मिळत आहे.
अहमदाबाद (गुजरात) : भारतामधील एंटरप्राइज-केंद्रित मॅनेज्ड ऑफिस स्पेस क्षेत्रातील आघाडीची कंपनी देव ॲक्सेलरेटर लिमिटेड (NSE: DEVX; BSE: 544513) आपल्या धोरणात्मक डेव्हलपमेंट मॅनेजमेंट (DM) मॉडेलच्या माध्यमातून वेगाने विस्तार करत मूल्यनिर्मिती करत आहे. या अभिनव मॉडेलमुळे कंपनीचा व्यावसायिक विस्तार 28 केंद्रांमध्ये 8.6 लाख चौरस फूटांहून अधिक कार्यरत वर्कस्पेसपर्यंत पोहोचला आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये कंपनीने ₹1,780 दशलक्ष महसूल नोंदवला असून, भारतातील व्यावसायिक रिअल इस्टेट मालमत्तांच्या विकास व उत्पन्ननिर्मितीच्या पद्धतीत हा एक महत्त्वाचा बदल मानला जात आहे.
परंपरागत जॉइंट डेव्हलपमेंट अॅग्रीमेंट्स (JDA)पेक्षा वेगळा दृष्टिकोन स्वीकारत, देवएक्सच्या डीएम मॉडेलमध्ये जमीनमालकांना त्यांच्या मालमत्तेचे 100% मालकी हक्क आणि नियंत्रण कायम ठेवण्याची मुभा दिली जाते. याच मॉडेलच्या जोरावर कंपनीने मुंबई, हैदराबादसारख्या मोठ्या महानगरांमध्ये तसेच अहमदाबाद, जयपूर, उदयपूर, इंदूर आणि सुरत या वेगाने वाढणाऱ्या टियर-2 शहरांमध्ये विस्तार केला आहे. झोमॅटो, मनुभाई अॅण्ड शाह, विफ्ली, पेपरचेस अॅण्ड कंपनी तसेच पर्सिस्टंट सिस्टिम्स यांसारख्या नामांकित कंपन्यांनी देवएक्ससोबत विविध शहरांमध्ये कार्यालयीन जागा घेतल्या आहेत.
फक्त विकसकाची भूमिका न घेता रणनीतिक भागीदार म्हणून पुढे येत, देवएक्स संपूर्ण प्रकल्पाचा एंड-टू-एंड प्रवास व्यवस्थापित करते. यामध्ये प्रकल्पाची व्यवहार्यता (फिजिबिलिटी) अभ्यास, डिझाइन, शासकीय परवानग्या, बांधकामावर देखरेख तसेच अंतिम भाडेकरार (लीझिंग) यांचा समावेश आहे.
या मॉडेलच्या यशाबाबत बोलताना देव ॲक्सेलरेटर लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक उमेश उत्तमचंदानी म्हणाले, “आमच्या रणनीतीचा केंद्रबिंदू म्हणजे डेव्हलपमेंट मॅनेजमेंट मॉडेल. हे मॉडेल बिगर-संस्थात्मक जमीनमालक आणि संस्थात्मक दर्जाच्या कार्यालयीन जागेची वाढती मागणी यांमधील दरी भरून काढण्यासाठी तयार करण्यात आले आहे. आज जमीनमालक आपली मालकी न गमावता जमिनीचे संपूर्ण मूल्य उलगडून दाखवू शकणाऱ्या व्यावसायिक भागीदारांचा शोध घेत आहेत, आणि ही स्पष्ट बदलती मानसिकता आम्हाला दिसत आहे. आमचे मॉडेल नेमके तेच साध्य करते—विकास प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर रिअल-टाइम डिजिटल पारदर्शकता आणि यशाशी निगडित फी संरचना देत, पहिल्या दिवसापासून हितसंबंध एकसंध ठेवते. या सहकार्यात्मक दृष्टिकोनामुळे आम्हाला वेगाने विस्तार करता येतो, तसेच आमच्या एंटरप्राइज क्लायंटसाठी प्रीमियम, रेडी-टू-मूव्ह वर्कस्पेस उपलब्ध करून देता येतात.”
डीएम मॉडेलद्वारे भांडवल उपलब्धता आणि गुंतागुंतीच्या नियामक अनुपालनासारख्या महत्त्वाच्या बाजारातील अडचणींवर प्रभावी उपाय केला जातो. देवएक्सच्या संस्थात्मक दर्जाच्या प्रक्रिया आणि मजबूत फंडिंग नेटवर्कचा लाभ घेत, जमीनमालकांना या भागीदारीतून अधिक चांगले आर्थिक परिणाम मिळतात. मुद्रांक शुल्कावरील बचत तसेच अतिरिक्त उत्पन्न स्रोतांमुळे जमीनमालकांना एकूण 20% ते 30% अधिक परतावा मिळतो.
“सप्लाय-लेड” आणि “डिमांड-लेड” या दुहेरी दृष्टिकोनातून देवएक्स स्वतःला वेगळे ठरवते. कंपनीच्या एकूण पोर्टफोलिओपैकी 70% हिस्सा दीर्घकालीन गरजा असलेल्या मोठ्या एंटरप्राइज क्लायंट्ससाठी राखीव आहे. विकास प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यासाठी देवएक्सकडे इन-हाउस तज्ज्ञता आहे. यामध्ये इंटीरियर सोल्यूशन्ससाठी “Phi Designs”, तसेच प्रकल्प व्यवस्थापन आणि लीझिंगसाठी समर्पित टीम्सचा समावेश आहे. या एकात्मिक क्षमतेमुळे प्रकल्प ठराविक कालमर्यादेत पूर्ण होतात आणि अनेकदा 75 ते 90 दिवसांत कल्पना पूर्णपणे सुसज्ज कार्यालयीन जागांमध्ये रूपांतरित केल्या जातात.
भारताचा रिअल इस्टेट क्षेत्र अधिक परिपक्व होत असताना, उत्तम सल्लागार व्यवस्था आणि वाढलेली पारदर्शकता यामुळे व्यावसायिक डेव्हलपमेंट मॅनेजमेंटची मागणी वेगाने वाढत आहे. या बदलाचे नेतृत्व करण्यासाठी देवएक्स सज्ज आहे, कारण कंपनीने आधीच 7.2 लाख चौरस फूट क्षेत्रफळासाठी करार केले आहेत. सर्व भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्यनिर्मिती करणाऱ्या सक्रिय समुदायांची उभारणी आणि शाश्वत मालमत्तांची निर्मिती करण्यासाठी कंपनीची बांधिलकी कायम आहे.

