पुणे: १३५ वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेली महात्मा फुले मंडई पुण्याचा मानबिंदू आहे. येथील व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या विद्युत दिवे आणि स्वच्छतेच्या समस्या तातडीने मार्गी लावण्यात येतील. येथील विद्युत दिव्यांच्या समस्या येत्या दोन दिवसात सोडविली जाईल, असे आश्वासन प्रभाग २५ चे नवनिर्वाचित नगरसेवक मा. राघवेंद्र बाप्पू मानकर यांनी दिले. महात्मा फुले मंडई येथील व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या आढावा दौऱ्यात ते बोलत होते.
यावेळी व्यापाऱ्यांनी सांगितले की, मंडईतील जुने झालेले विद्युत दिवे आणि अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे व्यापारी तसेच खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच स्वच्छतेच्या समस्येबाबतही व्यापाऱ्यांनी गारऱ्हाणे मांडले. यावर बोलताना राघवेंद्र बाप्पू मानकर म्हणाले की, “व्यापाऱ्यांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रकाशव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे तातडीने हे दिवे बदलण्याचे काम येतोय दोन दिवसात पूर्ण केले जाईल. तसेच मंडईच्या स्वच्छतेसाठी प्रशासनासोबत यंत्रणा कार्यरत करून कचरा साठणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे बाप्पू मानकर यांनी सांगितले.

