एडवर्ड पार्क (अध्यक्ष, कमिसार पॅनेल – UCI) यांनी बजाज पुणे ग्रँड टूर संदर्भात दिलेले अधिकृत पत्रक:
अधिकृत निवेदन
”सायकलस्वारांच्या मुख्य घोळक्यामध्ये (Peloton) एक अपघात झाला. मोठ्या संख्येने सायकलस्वार एकत्र असताना, शर्यतीचे बदलते स्वरूप, मोठे आव्हान आणि वेगवान वातावरण यामुळे रोड सायकलिंग शर्यतींमध्ये अशा घटना घडणे सामान्य आहे.
ठरलेल्या नियमावलीनुसार (Protocol), शर्यत २३ मिनिटांसाठी थांबवण्यात (Neutralize) आली होती. या घटनेत अडकलेल्या खेळाडूंना ताफ्यातील वैद्यकीय पथकाद्वारे तातडीने प्रथमोपचार देण्यात आले आणि त्यांना त्यांच्या सायकली बदलण्याची परवानगी देण्यात आली.
या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही आणि कोणालाही रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली नाही.
शर्यत अधिकाऱ्यांनी ही परिस्थिती अत्यंत व्यावसायिक पद्धतीने हाताळली. जास्तीत जास्त सायकलस्वार पुन्हा रस्त्यावर उतरून शर्यत पूर्ण करू शकले, यावरूनच ही परिस्थिती किती वेगाने आणि कार्यक्षमतेने हाताळली गेली हे स्पष्ट होते.
केवळ मलेशिया राष्ट्रीय संघाचा सायकलस्वार क्रमांक १६१, अब्दुल हलिल मोहम्मद इझत हा शर्यत पूर्ण करू शकला नाही. मात्र, सायकलस्वार क्रमांक १९१ एन्झो फुएन्टेस कॅपरोली आणि क्रमांक १९५ मार्टी रियारा कॅसानोव्हा (दोघेही प्रो सायकलिंग स्टॅट्स संघाचे) यांनी सायकल बदलल्यानंतर आपली शर्यत यशस्वीरित्या पूर्ण केली.”

