तुंबाडनंतर राही बर्वेचा प्रयोगशील थ्रिलर ‘मयसभा’

Date:

पुणे, : ‘तुम्बाड’ या चित्रपटाने सिनेसृष्टीत वेगळाच ठसा उमटवणारे दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांचा ‘मयसभा’ हा चित्रपट पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला. “२००७ साली ‘पिफ’मध्ये प्रेक्षक म्हणून सुरू झालेला माझा प्रवास आज ‘मयसभा’च्या स्क्रीनिंगपर्यंत पोहोचला आहे,” असं बर्वे यांनी सांगितलं.

‘मयसभा’ हा त्यांचा एक वैयक्तिक प्रयोग असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. “हा चित्रपट कोणत्याही ठराविक चित्रपट रचनेत बसवायचा नव्हता. विशेषतः दुसरा अर्धा भाग अधिक प्रयोगशील आणि वेगळा आहे,” असं बर्वे म्हणाले. त्यामुळे या चित्रपटात पारंपरिक कथानकाची अपेक्षा ठेवणाऱ्यांनाही नवीन अनुभव मिळेल.

चित्रपटाची मुख्य कथा सिने-विश्वातील कलाकार परमेश्वर खन्ना यांच्या भोवती फिरते. बॉलिवूड अभिनेता जावेद जाफरी यांनी परमेश्वर खन्ना या गुंतागुंतीच्या पात्राची भूमिका साकारली आहे. “तो नायकही नाही, खलनायकही नाही,” असं बर्वे सांगतात. परमेश्वरची पत्नी जयमाला यांच्या एका कृतीमुळे त्याच्यावर आणि मुलगा वासूवर खोल परिणाम होतो, परंतु चूक कोणाची हे शेवटपर्यंत रहस्यच राहते.

ही कथा एक बंद पडलेल्या थिएटरमध्ये घडते. बर्वे यांच्या म्हणण्यानुसार, चित्रपटात चार प्रमुख पात्रं असली तरी सर्वात महत्त्वाचं पात्र हे थिएटरच आहे. धूर, मच्छर आणि अस्ताव्यस्त वातावरणामुळे ते थिएटर जणू एक अडगळीची खोली बनते. या थिएटरमध्ये दडलेला सोन्याचा खजिना हा कथेला रहस्यात्मक वळण देतो.  
फक्त २५ जणांची टीम आणि २३ दिवसांत हा चित्रपट तयार झाला, कोणत्याही मोठ्या औद्योगिक पाठिंब्याशिवाय निर्माता गिरीश यांच्या पाठिंब्यामुळे हा चित्रपट पूर्ण झाला,” असं बर्वे म्हणाले.

नात्यांची कसोटी आणि स्त्रीचा लढा : ‘शॅडो बॉक्स’

कौटुंबिक वास्तव, मानसिक संघर्ष आणि नात्यांतील ताण यांची परिणामकारक मांडणी करणारा ‘शॅडो बॉक्स’ हा बंगाली-हिंदी चित्रपट ‘पिफ’मध्ये प्रदर्शित झाला. कुटुंबासाठी सातत्याने झटणारी स्त्री. तिचा पती, सामाजिक उपेक्षेला सामोरा जाणारा माजी सैनिक आणि एका अनपेक्षित घटनेनंतर कुटुंबातील नात्यांवर येणारा ताण हा चित्रपटाचा मुख्य आशय आहे. चित्रपटाचे अभिनेते चंदन बिष्ट म्हणाले, “या चित्रपटात स्त्रीचा संघर्ष आणि कुटुंबासाठीची तिची ताकद ठळकपणे चित्रित करण्यात आली आहे.

स्त्रीवाद आणि निसर्ग संवर्धन साधणारा ‘स्पायिंग स्टार्स’  

श्रीलंकन दिग्दर्शक विमुक्ति जयसुंदरा यांचा चित्रपट ‘स्पायिंग स्टार्स’ दाखवण्यात आला.
त्यानंतर त्यांनी संवाद साधला
ते म्हणाले, “आपण सध्या अशा वातावरणात जगत आहोत, जिथे निसर्गालाच संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे निसर्ग संवर्धन महत्वाचे आहे, या हेतूने ‘स्पायिंग स्टार्स’ची निर्मिती केली आहे.”
अभिनेत्री इंदिरा तिवारी म्हणाल्या, “मनुष्य म्हणून आपण निसर्गाचे घटक आहोत आणि मनुष्य म्हणून आपण पुढच्या पिढीला काहीतरी देणं लागतो आणि हा चित्रपट हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.”
या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये श्रीलंका राष्ट्रीय चित्रपट महामंडळ, फ्रान्सचे सीएनसी यांचा सहभाग आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये श्रीलंकेच्या मध्य भागातील डोंगराळ प्रदेशात याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. स्वित्झर्लंडच्या ‘व्हिजन्स सुड एस्ट’ या निधीतूनही या चित्रपटाला पोस्ट-प्रॉडक्शनसाठी आर्थिक मदत मिळाली आहे.

‘अ प्रेग्नंट विडो’ : विधवेच्या आयुष्यातील संघर्ष

“तिच्या पोटात वाढणाऱ्या जीवाला भविष्य हवं होतं, पण व्यवस्थेला तिच्या वेदनेची फाईलही उघडायला वेळ नव्हता,” अशी दारुण परिस्थिती विषद करणारा मल्याळम  चित्रपट ‘अ प्रेग्नंट विडो’ हा केवळ एका स्त्रीची कथा नाही, तर तो समाजव्यवस्थेवर टाकलेला एक संयत पण थेट प्रश्न आहे. दिग्दर्शक उन्नी के. आर. यांनी या चित्रपटातून गर्भवती विधवेच्या आयुष्यातील भावनिक, सामाजिक आणि प्रशासकीय संघर्ष अत्यंत सूक्ष्मतेने मांडला आहे. पतीच्या हत्येनंतर गर्भवती असलेली ही स्त्री न्याय, सुरक्षितता आणि मूलभूत हक्कांसाठी झगडताना दिसते. तिच्या वाट्याला येणारी उदासीनता, संशय आणि असहायता ही भूमिका अधिक वास्तववादी बनवते. अजीश कृष्णा यांची भूमिका या कथेत वेगळा भावनिक संदर्भ निर्माण करते.
दिग्दर्शक उन्नी के. आर. म्हणाले, “हा चित्रपट सहानुभूतीची मागणी करत नाही, तर समजून घेण्याची जबाबदारी प्रेक्षकांवर सोपवतो.”

निरागस नजरेत साठलेली भीती — ‘ब्ल्यू हेरॉन’

काही कथा मनाला हळूच स्पर्श करून जातात आणि नंतर बराच काळ शांतपणे मनात रेंगाळत राहतात, ‘ब्ल्यू हेरॉन’ हा असाच एक भावनिक अनुभव देणारा चित्रपट आहे. १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात, सहा जणांचे एक कुटुंब नव्या आशेने व्हॅनकुव्हर आयलंडवर स्थायिक होते. बाहेरून पाहता सगळं साधं, सुंदर आणि सुरळीत वाटतं. पण या शांततेआड दडलेली अस्वस्थता हळूहळू उघड होत जाते. या कथेचं वैशिष्ट्य म्हणजे तिची मांडणी. सगळ्या घडामोडी ‘साशा’ या लहान मुलीच्या नजरेतून मांडण्यात आली आहे.
या चित्रपटाची अभिनेत्री जी इरिंगो रेती यांनी चित्रपटानंतर संवाद साधला. त्या म्हणाल्या, “अनेक प्रसंगांमध्ये मला रडावंसं वाटायचं,पण आईला रडता येत नव्हतं. कॅमेऱ्यासमोर मला रडण्याची परवानगी नव्हती.” त्या म्हणाल्या की त्यात सामाजिक समुपदेशकासोबत सुमारे वीस मिनिटे चालणारा संवाद. हा महत्त्वाचा पण भावनिकदृष्ट्या गुदमरवणारा प्रसंग होता थकवा, असहायता आणि शांत सहनशीलता व्यक्त करताना अश्रू आवरावे लागत हो

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सूस, बाणेर पाषाण मध्ये तब्बल ११५७६ जणांनी वापरला ‘नोटा’ चा अधिकार

पुणे: पुणे महापालिकेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात 'नोटा' चा अधिकार...

१६वी अमनोरा पीवायसी एचटीबीए कप सुपर ५०० रँकिंग जिल्हा मानांकन बॅडमिंटन स्पर्धा

अमनोरा कप जिल्हा मानांकन बॅडमिंटन स्पर्धा : पीवायसी आणि...

सायकल अपघात:सायकलिंग शर्यतींमध्ये अशा घटना घडणे सामान्य…

एडवर्ड पार्क (अध्यक्ष, कमिसार पॅनेल - UCI) यांनी बजाज...