पुणे: किर्लोस्कर समूहाची कंपनी असलेल्या अवांते स्पेसेस लिमिटेडला पुण्यातील कोथरूड येथे असलेल्या त्यांच्या प्रमुख रिअल इस्टेट प्रकल्प ‘वन अवांते’साठी इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (IGBC) कडून सर्वोच्च मानांकन असलेले आयजीबीसी प्लॅटिनम प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.
‘वन अवांते’ या प्रकल्पात सध्या किर्लोस्कर समूहातील अनेक कंपन्या कार्यरत असून, तो शाश्वत आणि आधुनिक कार्यस्थळ पायाभूत सुविधांचा आदर्श नमुना मानला जात आहे. या प्रमाणपत्रामुळे पर्यावरणपूरक विकास, कार्यक्षम संचालन आणि भविष्यासाठी सज्ज रचनेबाबत अवांते स्पेसेसची ठाम बांधिलकी अधोरेखित होते.
आयजीबीसीकडून करण्यात आलेल्या मूल्यांकनामध्ये पाच प्रमुख पर्यावरणीय घटकांचा समावेश होता. यामध्ये स्थळ निवड व नियोजन, जलसंधारण, ऊर्जा संवर्धन, साहित्य संवर्धन, तसेच अंतर्गत पर्यावरण गुणवत्ता आणि कार्यस्थळ आरोग्य यांचा समावेश आहे. याशिवाय डिझाइनमधील नाविन्यपूर्णतेवर आधारित स्वतंत्र घटकाचाही विचार करण्यात आला.
प्रारंभिक नियोजन टप्प्यापासून ते दैनंदिन कार्यपद्धतीपर्यंत ‘वन अवांते’ या प्रकल्पाच्या केंद्रस्थानी शाश्वततेचा विचार ठेवण्यात आला आहे. या प्रकल्पात ऊर्जा कार्यक्षम प्रकाशयोजना व एचव्हीएसी प्रणाली, नैसर्गिक प्रकाशाचा जास्तीत जास्त वापर, प्रगत जलसंधारण तंत्रज्ञान, तसेच पुनर्वापर आणि संसाधनांचा कार्यक्षम उपयोग प्रोत्साहित करणारी सक्षम कचरा व्यवस्थापन प्रणाली अशा विविध हरित वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व उपक्रमांमुळे पर्यावरणावर होणारा परिणाम कमी होण्यास मदत होत असून, वापरकर्त्यांच्या आरोग्य आणि कल्याणातही वाढ होते.
या यशाबाबत प्रतिक्रिया देताना अवांते स्पेसेस लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पोरायथ म्हणाले, “‘वन अवांते’साठी मिळालेले आयजीबीसी प्लॅटिनम प्रमाणपत्र हे अवांते स्पेसेससाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा असून, शाश्वतता ही रिअल इस्टेट विकासाच्या डीएनएमध्येच असली पाहिजे, या आमच्या विश्वासाचे प्रतिबिंब आहे. डिझाइन आणि बांधकामापासून ते दैनंदिन संचालनापर्यंत ‘वन अवांते’ची संकल्पना पर्यावरणपूरक कार्यस्थळ म्हणूनच साकारण्यात आली आहे. आमचा पहिलाच रिअल इस्टेट प्रकल्प असलेल्या या उपक्रमाला मिळालेली ही मान्यता, किर्लोस्कर समूहाच्या मूल्यांशी आणि दीर्घकालीन दृष्टीकोनाशी सुसंगत, ऊर्जा कार्यक्षम आणि भविष्यासाठी सज्ज अशा जागा सातत्याने उभारण्याचा आमचा निर्धार अधिक दृढ करते.”
आयजीबीसी प्लॅटिनम मानांकन केवळ अवांते स्पेसेसच्या शाश्वततेला प्राधान्य देणाऱ्या दृष्टिकोनाची पुष्टी करत नाही, तर ब्रँडअंतर्गत भविष्यात होणाऱ्या सर्व विकास प्रकल्पांसाठी एक मजबूत आदर्शही निर्माण करते. आयजीबीसी प्रमाणित ठरणारा पहिला प्रकल्प म्हणून ‘वन अवांते’ अवांते स्पेसेसच्या ऊर्जा-जाणीवसंपन्न, पर्यावरणपूरक आणि जागतिक निकषांनुसार विकसित बांधकाम पर्यावरण निर्माण करण्याच्या ध्येयाला अधिक बळ देतो.
या यशाच्या माध्यमातून अवांते स्पेसेसने हरित, सुरक्षित आणि अधिक शाश्वत कार्यस्थळांची निर्मिती करण्याबाबतची आपली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली असून, भारताच्या विकसित होत असलेल्या रिअल इस्टेट क्षेत्रात सकारात्मक आणि अर्थपूर्ण योगदान देण्याचा आपला निर्धार व्यक्त केला आहे.
अवांते स्पेसेस लिमिटेडच्या प्रकल्पाला आयजीबीसी प्लॅटिनम प्रमाणपत्र प्राप्त
Date:

