नरेंद्र मोदींकडून राजमाता अहिल्याबाई होळकर व धनगर समाजाचा अपमान; काशीतील पवित्र मणिकर्णिका घाट उद्ध्वस्थ: नाना पटोले

Date:

हिंदुंचे रक्षणकर्ते म्हणवणाऱ्या मोदी-योगींकडूनच काशीतील हिंदुंची शेकडो मंदिरे उद्वस्थ; हिंदुच्या अस्मितेवर घाला घालणारे हे कसले हिंदुत्वत्वादी ?

मुंबई, दि. २० जानेवारी २०२६
राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी न्याय, धर्म आणि लोककल्याणासाठी राज्य केले, हिंदु धर्मासाठी पवित्र अशा काशी विश्वनाथ आणि सोमनाथ मंदिरांसह अनेक मंदिरांची पुनर्बांधणी केली. स्वतःला हिंदु धर्माचे रक्षक समजणाऱ्या नरेंद्र मोदी व योगी आदित्यनाथ यांनी मात्र आज अहिल्याबाईंनी काशीत बांधलेला पवित्र मणिकर्णिका घाट उद्धवस्थ केला, हा तमाम हिंदू तसेच धनगर समाजाचा अपमान आहे. मोदी-योगी यांनी हिंदुंच्या अस्मितेवर घाला घातला आहे. विकासाच्या नावाखाली हिंदुंच्या अस्मितेशी खेळण्याचा भाजपा, नरेंद्र मोदी व योगी आदित्यनाथ यांना काही अधिकार नाही, त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, काशी हे केवळ एक शहर नसून हिंदु समाजासाठी अत्यंत मानाचे व पवित्र अध्यात्मिक केंद्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच काशीतून तीनवेळा निवडून आले आहेत. काशीच्या विकासाच्या नावाखाली नरेंद्र मोदी यांनी शेकडो मंदिरे तोडली आणि आता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला मणिकर्णिका घाट उद्ध्वस्थ केला आहे, अहिल्यादेवींची प्रतिमाही तोडली. मणिकर्णिका घाटावर अंत्यसंस्कार केल्याने आत्म्याला थेट मोक्ष मिळतो, अशी हिंदु धर्मात धारणा आहे, हे ५१ शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. हिंदु धर्मासाठी पवित्र अशा घाटावर बुलडोझर चालवून मोदी व योगी यांनी हिंदु समाजाचा घोर अपमान केला आहे. तर असे काही घडलेच नाही, जे दाखवले जाते ते एआय (AI) दृश्य आहे असा कांगावा स्वतःला संत म्हणवणारे, भगवे कपडे घालणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सांगत आहेत. होळकर कुटुंबातील काही लोकांनी काशीला जावून वस्तुस्थिती पाहिली व सरकारला पत्र पाठवले आहे. मी उद्या काशीला जाऊन वस्तुस्थिती पाहणार आहे व मोदी – योगी सरकारचा निषेध करणार आहे, असे नाना पटोले म्हणाले.

‘दावोस’मधील करारांचे पुढे काय होते?

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुंतवणूक आणण्यासाठी यावर्षीही दावोसला गेले आहेत पण ही फक्त इव्हेंटबाजी आहे. याआधीही लाखो कोटी रुपयांचे करार झाल्याचा दावा केला. एवढी मोठी गुतंवणूक राज्यात आली तर मग बेरोजगारी का वाढली, याचे उत्तर द्यावे. राज्यात मोठ्या प्रामणात उद्योग यावेत, ही अपेक्षा आहे पण सरकार करत असलेले दावे आणि वस्तुस्थिती यात मोठी तफावत आहे. राज्य कर्जबाजारी झाले आहे, सरकारकडे पगार करण्यासाठी पैसे नाहीत, कंत्राटदारांची बिले थकली आहेत. विकासकामासाठी पैसे नाहीत आणि मुख्यमंत्री दावोसमध्ये कोट्यवधी रुपयांची उधळण करत आहेत, असे नाना पटोले म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अवांते स्पेसेस लिमिटेडच्या प्रकल्पाला आयजीबीसी प्लॅटिनम प्रमाणपत्र प्राप्त

पुणे: किर्लोस्कर समूहाची कंपनी असलेल्या अवांते स्पेसेस लिमिटेडला पुण्यातील...

लढाई संपली आता सर्वजण एकत्र येऊ… आपल्या औंध बोपोडीला विकासात अग्रेसर ठेऊ !!!

नवनिर्वाचित नगरसेवक सनी निम्हण यांनी घेतली विरोधकांची भेट पुणे :...

‘बजाज पुणे ग्रँड टूर’अंतर्गत दुसऱ्या टप्प्याचे २१ जानेवारी रोजी आयोजन.

▪️लेडीज कल्ब, कॅम्प येथून सुरूवात; नांदेड सिटी सिंहगड रोड...

टी.सी.एस. ते आकुर्डी घाट-वळण रस्त्यावर नागरिकांची दुतर्फा गर्दी

उद्घाटनाला ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची उपस्थिती पुणे, दि. २०...