▪️लेडीज कल्ब, कॅम्प येथून सुरूवात; नांदेड सिटी सिंहगड रोड येथे समारोप
देश-विदेशातील नामांकित सायकलपटूंचा सहभाग
पुणे: ‘बजाज पुणे ग्रँड टूर–२०२६’ अंतर्गत टप्पा क्रमांक दोनच्या आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून हा टप्पा बुधवार, दि. २१ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १ वाजून ३० वाजता लेडीज कल्ब, कॅम्प येथून सुरू होणार असून नांदेड सिटी सिंहगड रोड येथे समारोप होणार आहे.
या टप्प्यात पुणे शहर, पुरंदर आणि राजगड आणि हवेली तालुक्यातून ही रेस जाणार आहे. यास्पर्धेची एकूण एकूण १०९.१५ किलोमीटर आहे. ही स्पर्धा फक्त महाराष्ट्राची नव्हे तर देशाची सर्वात मोठी स्पर्धा असणार आहे. स्पर्धेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्याचा इतिहास पुढे येणार आहे असून एक नवीन इतिहास जगासमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. प्रशासनासोबत स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.
असा असेल स्पर्धेचा टप्पा-२
लेडीज कल्ब, कॅम्प येथून प्रारंभ होऊन गोळीबार चौक, कोंढवा, येवलेवाडी, भिवरी, चांबळी, कोडीत, नारायणपूर, चिव्हेवाडी, केतकावळे, कापूरहोळ, कासुर्डी, मोहरी, जांबळी, आंबवणे, करंजावणे, वांगणी, निघडे, कुसगाव, शिवापूर, कोंढणपूर, सिंहगड घाट रोड, डोणजे, किरकिटवाडी, खडकवासला आणि नांदेड सिटी सिंहगड रोड येथे स्पर्धेचा शेवट होणार आहे.
0000

