येस बँकेच्या नफ्यात लक्षणीय वाढ

Date:

मुंबई, 17 जानेवारी, 2026: येस बँकेने आपले Q3FY26 चे निकाल जाहीर केले असूनकरपश्चात नफ्यात वार्षिक 55.4% वाढ झाली असून तो ९५२ कोटी रुपये एवढा झाला आहे. बँकेचा ऑपेरेटिंग नफा (ग्रॅच्युइटीच्या परिणामासाठी समायोजित) 1,389 कोटी रुपयांपर्यंत वाढलाजो वार्षिक 28.7% आणि तिमाहीत  7.1% ची सुधारणा दर्शवतो. Q3 FY26 साठी निव्वळ व्याज उत्पन्न (NII) 2,466 कोटी रुपये होतेयात वार्षिक 10.9% तर तिमाहीत 7.2% नी वाढ झाली आहे. या तिमाहीसाठी निव्वळ व्याज मार्जिन (NIM) 2.6% एवढे आहेजे वार्षिक आधारावर 20 बेसिस पॉइंट्स आणि तिमाही आधारावर 10 बेसिस पॉइंट्सनी जास्त आहे. बिगर-व्याज उत्पन्न 1,633 कोटी रुपये होतेज्यात वार्षिक 8.0% ने वाढ झाली आहे.

सलग सहाव्या तिमाहीत बँकेने आपले खर्च-उत्पन्न गुणोत्तर यशस्वीरित्या कमी केले आहे. जे आर्थिक वर्ष 26 च्या तिसऱ्या तिमाहीत 66.1% वर पोहोचले आहे.  तर आर्थिक वर्ष 26च्या तिसऱ्या तिमाहीत मालमत्तेवरील परतावा (RoA) सुधारून 0.9% झाला, जो आर्थिक वर्ष 25च्या याच काळात आणि आर्थिक वर्ष 26च्या दुसऱ्या तिमाहीतील 0.6% पेक्षा जास्त आहे.

वार्षिक ताळेबंदात सकारात्मक गती कायम राहिली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत एकूण ठेवी 5.5% ने वाढून 2,92,524 कोटी रुपये झाल्या. CASA गुणोत्तर Q3FY25 मधील 33.1% वरून 34% पर्यंत वाढले. निव्वळ कर्जांमध्ये वर्षभरात 5.2% आणि तिमाहीत 2.9% वाढ होऊन ती 2,57,451 कोटी रुपये झाली.

निकालांवर आणि आर्थिक कामगिरीवर भाष्य करताना, येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्री. प्रशांत कुमार म्हणाले, नफ्यातील वाढमालमत्तेच्या गुणवत्तेत झालेली लक्षणीय सुधारणाव्यवसायाचा विस्तार, (वितरण) आलेली गती आणि CASA मधील सातत्यपूर्ण या क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरी यांसारख्या अनेक घटकांमुळे आर्थिक वर्ष 26मधील तिसरी तिमाही ही बँकेसाठी एक महत्त्वपूर्ण तिमाही ठरली आहे.”

पुनर्रचनेनंतर प्रथमचबँकेच्या तिमाही RoA ने (ग्रॅच्युइटीचा परिणाम वगळून) 1.0% चा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. प्रत्यक्ष कार्यवाहीच्या वेळीनिव्वळ व्याज मार्जिनमधील वाढशुल्क उत्पन्नातील तेजी आणि परिचालन खर्चांवर ठेवलेल्या कठोर नियंत्रणामुळे हे शक्य झाले आहे. याव्यतिरिक्तया तिमाहीत निव्वळ क्रेडिट खर्च नगण्य होताज्याला कर्जाच्या 1.6% इतक्या आठ-तिमाहीतील नीचांकी स्लिपेजमुळे आणि सिक्युरिटी रिसीट्स पोर्टफोलिओमधून सुरू असलेल्या वसुलीमुळे पाठिंबा मिळाला.

उद्योग क्षेत्रातील आव्हानात्मक परिस्थिती असूनही CASA गुणोत्तर मजबूत झाल्यामुळेप्रतिस्पर्धकांच्या तुलनेत ठेवींच्या खर्चात अधिक वेगाने सुधारणा होत आहे. शिवायविशेषतः किरकोळ कर्ज वितरणाला गती मिळाल्यानेआगामी तिमाहीत वाढ अधिक वेगाने होईलअशी आम्हाला अपेक्षा आहे. या अनुकूल घटकांच्या मदतीनेआम्ही आमची धोरणात्मक उद्दीष्टे पूर्ण करण्याच्या आणि भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करणारी एक लवचिकउच्च-गुणवत्तेची संस्था उभारण्याच्या मार्गावर ठाम आहोत.

31 डिसेंबर 2025पासून येस बँकेचा निफ्टी बँक इंडेक्समध्ये समावेश करण्यात आला. आर्थिक वर्ष 2026च्या तिसऱ्या तिमाहीत, येस बँकेने 33 नवीन शाखा उघडल्या आणि 9 महिन्यांत एकूण 76 शाखा उघडल्या आहेत, ज्यामुळे पूर्ण वर्षाच्या 80 शाखांच्या उद्दिष्टापैकी 95% उद्दिष्ट साध्य झाले आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कॉन्ट्रिब्युटरी प्रॉव्हिडंट फंड (TFCICPF) च्या विश्वस्तांसाठी कस्टडी सेवा प्रदाता म्हणून नियुक्ती झाल्यामुळे बँकेला कस्टोडियल सेवांमध्ये सर्वात मोठ्या सरकारी कंत्राटांपैकी एक मिळाले. याबरोबरच कस्टोडियन क्लिअरिंगमधील सर्वोच्च कामगिरी करणारी बँक म्हणूनही बीएसईकडून बँकेला गौरवण्यात आले, ज्यामुळे भांडवली बाजारातील कामकाजात तिच्या नेतृत्वाला पाठबळ मिळाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धायरी येथील बेनकरवस्ती रस्त्याचे काम रखडले,अपघात, प्रचंड वाहतूक कोंडीने नागरिकांचे हाल

पालिकेचा गलथान कारभार पुणे:धायरी येथील सर्वात दाट लोकवस्तीच्या बेनकरवस्ती मुख्य...

पुण्यात पशुवैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव; विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

पशुसंवर्धन विभागाच्या यशोगाथा सोशल मीडियावरून लोकांपर्यंत पोहोचवा; महिला पशुपालकांच्या...

जागतिक शांततेसाठी पुढाकार घ्या:अण्णा हजारेंचे पंतप्रधान मोदींना पत्र

मध्यपूर्वेतील तणावावर व्यक्त केली चिंतापुणे-इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात...

“बाई म्हणे देवा, नको सोन्याचा हार,मान द्यावा जगाने, तोच माझा श्रृंगार”

लोकपरंपरेतील बाईपण ते आत्मभान देणारं आजचं माणूसपण…!! "बाई म्हणे देवा,...