पुणे–सोलापूर महामार्गावर भीषण अपघात: अक्कलकोटला निघालेल्या 5 मित्रांचा जागीच मृत्यू

Date:

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी रात्री उशिरा एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारला भीषण अपघात झाला असून, यामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मोहोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देवडी पाटीजवळ रात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल (जि. रायगड) येथून सहा मित्र एर्टिगा कारने (क्रमांक MH-46 Z 4536) अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी निघाले होते. शनिवारी (१७ जानेवारी २०२६) रात्री ११:३० च्या सुमारास ही कार मोहोळ जवळील देवडी पाटी परिसरात आली असता, चालकाचा वाहनावरील ताबा अचानक सुटला. भरधाव वेगातील ही कार महामार्गापासून सुमारे १० ते १५ फूट दूर झुडपांमध्ये जाऊन एका मोठ्या झाडावर जोरात आदळली.

हा अपघात एवढा भीषण होता की, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. धडकेचा आवाज ऐकून आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. कारमध्ये ३ पुरुष आणि ३ महिला असे एकूण ६ प्रवासी होते. यापैकी ५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह वाहनामध्ये पूर्णतः अडकलेल्या अवस्थेत होते. या अपघातातून ज्योती जयदास टाकले (रा. सेक्टर ७, पनवेल) या महिला सुदैवाने बचावल्या आहेत.

घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. जखमी ज्योती टाकले यांना तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, मोहोळ येथे दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

रात्रीची वेळ आणि वेगाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मृत व्यक्तींची सविस्तर नावे आणि पत्ते शोधण्याचे काम सध्या पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे. हे सर्व जण पनवेल परिसरातील रहिवासी असून ते एकमेकांचे मित्र होते, असे समजते. महामार्गावर झुडपांमध्ये ही कार अडकल्याने रात्रीच्या वेळी मदतकार्यात काही अडचणी आल्या होत्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महामार्गालगत दारूच्या दुकानांना परवानगी देऊ नये:खा.मेधा कुलकर्णी यांची संसदेत मागणी

देशातील वाढत्या रस्ते अपघातांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे पुणे :...

चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश,कोथरुड मधील पानशेत पुरग्रस्तांचा बहुप्रलंबित प्रश्न मार्गी

पुणे-राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या...

मुलींच्या घटत्या संख्येवरही विधानसभेत चिंता व्यक्त

मुंबई-गर्भलिंग संदर्भात गंभीर प्रश्न आमदार सुरेश धस यांनी आज...