पुण्यात राज्य क्रीडा दिन उत्साहात साजरा
पुणे, दि.१७: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल आयोजित उपक्रमात ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांची १०१ चित्रे रेखाटून राज्य क्रीडा दिनानिमित्त त्यांना अनोखी मानवंदना देण्यात आली.
पाषाण येथील लोकसेवा ई स्कूलमध्ये खाशाबा जाधव यांच्या १०१ जयंती निमित्त १०१ विद्यार्थीनी एकाच वेळी त्यांची १०१ चित्रे साकरली.
यावेळी पॅरा ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता सचिन खिलारी, लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिपक पायगुडे, लेखक प्रा. संजय दुधाणे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, प्राचार्य पी. एच. षाफीमोन, क्रीडा अधिकारी दादासाहेब देवकाते आदी मान्यवर उपस्थित होते.
खाशाबा जाधव यांचे विद्यार्थ्यांनी काढलेल्या रंगीत तैलचित्राचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. खाशाबांची सर्वात्तम चित्रे साकारणाऱ्या १० विद्यार्थींना स्मृतिचिन्ह देऊन तर १०१ बाल चित्रकारांचा खाशाबांचे चरित्र पुस्तक भेट देऊन सचिन खिलारी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कला शिक्षिक शंकर साळुंखे, शुभांगी कुलकर्णी, स्वाती पवार, शितल लाडवते यांचे विद्यार्थ्याना मार्गदर्शन लाभले.
आदर्श असणाऱ्या खाशबा जाधव यांचा वारसादार मी झालोय असे सांगून सचिन खिलारी म्हणाले की, खाशाबांना पदकानंतर ४ वर्षांनी शासकीय नोकरी मिळाली होती. मला पदक जिंकताच चार दिवसात नोकरी मिळाली. शासन सुविधा देत असल्याने महाराष्ट्रात आता खाशाबांसारखे खेळाडू निर्माण होत आहे. प्रबळ इच्छाशक्ती आणि कष्ट करण्याची जिद्द असेल तर आपल्या देशाला ऑलिम्पिकमध्ये नक्कीच पदके मिळतील असा विश्वासही खिलारी यांनी बोलताना व्यक्त केला.
खाशाबा जाधव यांच्या हेलसिंकी ऑलिम्पिकची गाथा सांगून संजय दुधाणे म्हणाले की, खाशाबांची शाळेतच जडणघडण झाली होती. खेळाडूंना प्रोत्साहित करणाऱ्या शाळेत खाशाबांना चित्ररूपी मानवंदना देणारी उपक्रम प्रेरणादायी आहे.
शासनाच्या योजनांची माहिती देत जगन्नाथ लकडे यांनी सांगितले की, खाशाबांना जन्मदिन राज्य दिन दिन म्हणून राज्यात साजरा होत असताना चित्ररूपी उपक्रमांनी त्यांच्या कार्याला विद्यार्थ्यांनी सलामी दिली आहे. शतकोत्तर जयंती ही पुण्यात अनोख्या उपक्रमाने साजरी होत आहे.
कार्यक्रमााचे सूत्रसंचालन दीपाली गजभिये यांनी केले तर आभार दादासाहेब देवकाते यांनी मानले.

