शंभला ब्रदरहुड प्रीमियर लीग यशस्वीपणे संपन्न

Date:

पुरुष गटात सनराईज गणराज जायंट्स तर महिला गटात पीकेजी येरवडा स्ट्रायकर्स विजेते

पुणे:
पुणे ब्रदरहुड फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेली शंभला ब्रदरहुड प्रीमियर लीग (BPL) क्रिकेट स्पर्धा अत्यंत उत्साहात आणि दिमाखात यशस्वीपणे संपन्न झाली. ही स्पर्धा नुकतीच एएफके  खडकी येथील मैदानावर दिवस – रात्र  प्रकाशझोतात पार पडली. या स्पर्धेत सनराईज गणराज जायंट्स संघाने पुरुष गटाचे विजेतेपद पटकावले, तर बी अँड बी बॅशर्स उपविजेते ठरले. महिला गटात पीकेजी येरवडा स्ट्रायकर्स विजेते, तर पीकेजी  प्राधिकरण पँथर्स उपविजेते ठरले.

या स्पर्धेत पुरुष गटातील ७ संघ आणि महिला गटातील ४ संघ सहभागी झाले होते. तीन दिवस चाललेल्या चुरशीच्या सामन्यांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांचे मन जिंकले.  स्पर्धेसोबत आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्निव्हलमुळे क्रीडासोबतच मनोरंजनाचाही संगम साधला गेला. विविध खेळ, खाद्यपदार्थ आणि उपक्रमांमुळे संपूर्ण परिसर उत्सवमय झाला होता.

या प्रसंगी मुख्य अतिथी  अरुण ठाकूर (चीफ इंजिनिअर, खडकी अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी) उपस्थित होते.  या यशस्वी आयोजनाचे श्रेय ब्रदरहुड चे सीएमडी ईश्वरचंद गोयल , चेअरमन संदीप अग्रवाल, उप-चेअरमन अजय जिंदल, अध्यक्ष सागर अग्रवाल, सचिव कर्नल नरेश गोयल, संचालक पवन बंसल,  संजयाकुमार अग्रवाल,  राजेश मित्तल, नरेंद्र गोयल, योगेश जैन,  योगेश पोद्दार, प्रशांत अग्रवाल, अरविंद अग्रवाल तसेच त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणीला जाते.

या स्पर्धेत  सर्वोत्तम खेळाडू: प्रमोद अग्रवाल, सर्वोत्कृष्ट चॅम्पियन खेळाडू: प्रमोद अग्रवाल, सर्वोत्कृष्ट फायटर खेळाडू: अजय जिंदल सर्वोत्कृष्ट चॅम्पियन फलंदाज: अजय जिंदल, सर्वोत्कृष्ट फायटर फलंदाज: पवन बन्सल, सर्वोत्कृष्ट चॅम्पियन क्षेत्ररक्षक: सीए योगेश पोद्दार, सर्वोत्कृष्ट चॅम्पियन गोलंदाज: आदित्य अग्रवाल  यांनी महत्वाचे पुरस्कार पटकावत स्पर्धेत आपली छाप सोडली. 

शंभला ब्रदरहुड प्रीमियर लीग मध्ये सनराइज गणराज जायंट्स,   B&B बॅशर्स,  G B स्मॅशर्स,  श्रीराम स्ट्रायकर्स,  SNPS असेंडर्स,  वायुदूत रेसर्स हे पुरुष संघ तर  पीकेजी येरवडा स्ट्रायकर्स, पीकेजी प्राधिकरण पँथर्स,  पीकेजी मार्केट यार्ड वॉरियर्स,  पीकेजी औंध ॲव्हेंजर्स हे महिला संघ सहभागी झाले होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राघवेंद्र बाप्पू मानकर महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी.तब्बल २६ हजार ४९७ मतांचे विक्रमी मताधिक्य

पुणे : पुण्यासह राज्यातील २८ महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या निकालाची मतमोजणी...

जनमत चाचणीची आठवण जपणारा गोवा अस्मिता दिन साजरा

जीआय-टॅग उत्पादनांमुळे गोव्याचा पारंपरिक वारसा संरक्षित – मुख्यमंत्री डॉ....

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ विजयी उमेदवार

राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र सार्वत्रिक निवडणूक २०२५-२०२६ - विजयी...

मराठा शौर्य दिनानिमित्त राजेंद्र पवार यांची अष्टधान्यतुला

पुणे, – महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र...