पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ औंध बोपोडी मतदार संघात भाजपने विरोधकांचा धुव्वा उडवला. भाजपचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने या प्रभागातून निवडून आले. अ गटातून परशुराम वाडेकर यांना २० हजार १२६, ब गटातून भक्ति अजित गायकवाड यांना २० हजार ३८३, क गटातून सपना छाजेड यांना २१ हजार १०७, तर क गटातून चंद्रशेखर (सनी) निम्हण यांना २१ हजार ७८२ मते मिळवत विजय मिळवला.
प्रभाग क्रमांक ८ मध्ये मतदारांनी नोटाला जास्त मते दिली. अ गटात १ हजार ६१३, ब गटात १ हजार ९२८, क गटात १ हजार ७४९ तर ड गटात २ हजार ०८१ मते मिळून ७ हजार ३७१ मते पडली. याचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादीच्या कॉंग्रेसला बसला असे चित्र आकडेवारीवरून स्पष्ट होते.
प्रमुख पक्षांचे उमेदवार व त्यांना मिळालेली मते
अ गट (अनुसूचित जाती)
परशुराम बाळकृष्ण वाडेकर (भाजप) २०१४६
सुंदर नितीन ओव्हाळ (कॉंग्रेस) ३८७२
विनोद दादासाहेब राणपिसे (राष्ट्रवादी कॉंग्रेस) ११३९९
मिलिंद गेनू खरात (वंचित) १६७९
ब गट महिला ओबीसी
भक्ती अजित गायकवाड (भाजप) २०३८३
पौर्णिमा बाळासाहेब रानवडे (राष्ट्रवादी कॉंग्रेस) १२२१९
प्राजक्ता गायकवाड (कॉंग्रेस) ४८२१
आतार मुसकान नाजीम (आप)१४८५
क गट सर्वसाधारण महिला
सपना छाजेड (भाजप) २११०७
अर्चना मुसळे (राष्ट्रवादी कॉंग्रेस) ११४१०
सुप्रिया भुतडा (कॉंग्रेस) ३८४४
अश्विनी अशोक गायकवाड (वंचित) २३८२
ड गट सर्वसाधारण
चंद्रशेखर (सनी) निम्हण (भाजप) २१७८२
प्रकाश ढोरे (राष्ट्रवादी कॉंग्रेस) १३७२८
रमेश पवळे (कॉंग्रेस) ९४१
अमित जाविर (आप) १२०९

