पुणे- येथील महा पालिकेत सत्ता मिळवण्यासाठी 83 जागांची आवश्यकता आहे. महायुतीतील तिन्ही पक्ष पुण्यात स्वतंत्र लढले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला, पुण्यात मोठा फटका बसल्याचं चित्र आहे. तर भाजप शिवसेना यांना ३० पेक्षा जास्त जागांवर आघाडी आहे. आतापर्यंतच्या कलानुसार भारतीय जनता पक्षाने (भाजप) शहरात मोठी आघाडी घेतली आहे. भाजपने तब्बल १११ जागांवर आघाडी मिळवत विजयाचा मार्ग सुकर केला आहे, ज्यामुळे विरोधकांना मोठा धक्का बसला आहे.

पुणे प्रभाग १
अ- अश्विनी राहुल भंडारे भाजप
ब -संगिता दांगट – भाजप
क – रेखा चंद्रकांत टिंगरे राष्ट्रवादी
ड-अनिल वसंतराव टिंगरे भाजप
प्रभाग ३
अ श्रेयस प्रितम खांदवे भाजप
ब अनिल दिलीप सातव भाजप
क ऐश्वर्या पठारे भाजप
ड रामदास दाभाडे भाजप
प्रभाग ८
अ परशुराम वाडेकर भाजप
ब अजित गायकवाड भाजप
क सपना छाजेड भाजप
ड सनी उर्फ चंद्रशेखर निम्हण भाजप
प्रभाग १०
अ किरण दत्तात्रय दगडे भाजप
ब रुपाली पवार भाजप
क अल्पना वरपे भाजप
ड दिलीप तुकाराम वेडेपाटील भाजप
प्रभाग १८
अ साहिल केदारी काँग्रेस
ब कालिंदा पुंडे भाजप
क कोमल शेंडकर भाजप
ड प्रशांत जगताप काँग्रेस
प्रभाग २०
अ राजेंद्र शिळीमकर भाजप
ब तन्वी दिवेकर भाजप
क मानसी देशपांडे भाजप
ड गौरव घुले राष्ट्रवादी
प्रभाग २१
अ प्रसन्न वैरागे भाजप
ब सिद्धी शिळीमकर भाजप
क मनिषा चोरबोले भाजप
ड श्रीनाथ भीमाले भाजप
प्रभाग २२
अ मृणाल कांबळे भाजप
ब रफिक अब्दुल रहीम शेख काँग्रेस
क अर्चना पाटील भाजप
ड विवेक यादव भाजप
प्रभाग २५
अ स्वप्नाली पंडित भाजप
ब राखवेंद्र मानकर भाजप
क स्वरदा बापट भाजप
ड कुणाल टिळक भाजप
प्रभाग ३३
अ धनश्री कोल्हे भाजप
ब अनिता इंगळे राष्ट्रवादी शरद पवार
क सुभाष मुरलीधर नाणेकर भाजप
ड सोपान उर्फ काका चव्हाण राष्ट्रवादी शरद पवार
प्रभाग ३५
ब मंजूषा दीपक नागपुरे भाजप बिनविरोध
ड श्रीकांत जगताप भाजप बिनविरोध
प्रभाग ३६
अ वीणा घोष भाजप
ब शैलजा भोसले भाजप
क सई थोपडे भाजप
ड महेश वाबळे भाजप
प्रभाग ३७
अ किशोर धनकवडे
ब वर्षा तापकीर,
क तेजश्री बदक विजयी
ड अरुण राजवाडे
प्रभाग ३९
अ वर्षा साठे भाजप
क रुपाली धावडे: भाजप
ड बाळा ओसवाल भाजप
प्रभाग ४०
अ अर्चना जगताप भाजप
ब वृषाली कामठे भाजप
क पूजा कदम भाजप
ड रंजना टिळेकर भाजप

पुण्यात तब्बल नऊ वर्षांनंतर होत असलेल्या महापालिका निवडणुकीसाठी काल मतदान पार पडलं. महापालिका निवडणुकीसाठी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुक्काम ठोकला होता. तर केंद्रिय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जोरदार ताकद लावली अन् भाजपचा प्रचार केला होता. त्यानंतर आता पुण्याच भाजपच मोठा पक्ष ठरल्याचं पहायला मिळतंय. भाजपने राष्ट्रवादीचा सपाटून पराभव करत पुन्हा महापौर पदावर दावा ठोकला आहे.
पुणेकरांनी फुकटचा प्रवास नाकारला
प्रचारादरम्यान भाजपने ‘125 जागा जिंकू’ असा दावा केला होता. मेट्रो, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भुयारी रस्ते, विकासकामांचा मुद्दा भाजपने पुढे केला. त्याला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसने थेट सामान्य पुणेकरांना भिडणाऱ्या घोषणा केल्या, मोफत पीएमपी आणि मेट्रो बससेवा, तसेच छोट्या घरांना मिळकतकर माफी. या घोषणांनी निवडणुकीचं वातावरणच बदलून टाकल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. पण पुणेकरांनी फुकटचा प्रवास नाकारला अन् भाजपला आपली पसंती दर्शवली.

