डी.वाय.आकुर्डी, एटीएसएस, व्हीआयटी पुणेचे दमदार विजय

Date:

एमआयटी–एडीटी विद्यापीठातील क्रिकेट सामन्यांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद
लोणी काळभोर :
एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे यांच्या वतीने आयोजित आठव्या विश्वनाथ स्पोर्ट्स मीट (व्हीएसएस–२०२६) अंतर्गत क्रिकेट स्पर्धेत बुधवारी चुरशीचे सामने खेळविण्यात आले. एमआयटी कॉलेज ग्राउंड आणि निकम स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर झालेल्या या सामन्यांत डी.वाय.पाटील आकुर्डी, औद्योगिक तंत्र शिक्षण संस्था (एटीएसएस) आणि विश्वकर्मा इस्टिट्युट ऑफ टेक्नाॅलाॅजी व्हीआयटी पुणे संघांनी प्रभावी विजय नोंदवत आपली ताकद सिद्ध केली.

एमआयटी कॉलेज ग्राउंडवर झालेल्या सामन्यात डी.वाय. आकुर्डी संघाने यजमान एमआयटी एडीटी स्कुल ऑफ कंम्युटींग (एसओसी) ब संघावर १७ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत डीवाय पाटील आकुर्डीने १३ षटकांत ५ बाद १०४ धावांची लढाऊ धावसंख्या उभारली. कर्णधार शिवम के. मिश्रा याने केवळ २४ चेंडूत ५ चौकार व १ षटकारासह ४० धावांची आक्रमक खेळी केली, तर अंकुर शर्मा याने २३ धावांची मोलाची साथ दिली. प्रत्युत्तरात एमआयटी एडीटी एसओसी ब संघाला लक्ष्य गाठता आले नाही. यश उंबरे याने ३ षटकांत १६ धावा देत ३ बळी घेत संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली आणि एमआयटी एसओसी संघ १३ षटकांत ६ बाद ८७ धावांपर्यंतच मजल मारू शकला.

निकम स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या सामन्यात एटीएसएस संघाने एसबी पाटील आर्किटेक्चर महाविद्यालय संघावर ६ गडी राखून सहज विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत एसबी पाटील कॉलेजने १७ षटकांत ९ बाद ११३ धावा केल्या. एटीएसएस कडून आदित्य राऊत आणि ऋषी चोरडिया यांनी प्रत्येकी दोन बळी घेत प्रतिस्पर्ध्यावर दबाव निर्माण केला, तर तेजस चौहान याने अत्यंत किफायतशीर गोलंदाजी केली. ११४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित बनसोडे (नाबाद ३०) आणि सुजित आवटे (नाबाद १९) यांच्या संयमी खेळीमुळे एटीएसएस संघाने केवळ ११.५ षटकांत विजय मिळवला.

दिवसाच्या तिसऱ्या सामन्यात व्हीआयटी पुणे संघाने सूर्यदत्त बावधन संघावर ७ गडी राखून दणदणीत विजय नोंदवला. प्रथम फलंदाजी करत सूर्यदत्त बावधन संघ अवघ्या ११.४ षटकांत ७७ धावांत गारद झाला. सिद्धांत महाजन (२/७), अथर्व करोडे (२/९) आणि सोहम व्यवहारे (२/१६) यांच्या शिस्तबद्ध गोलंदाजीमुळे प्रतिस्पर्धी संघ अडचणीत आला. ७८ धावांचे लक्ष्य आदी नेने (नाबाद २६) आणि सोहम कदम (२५) यांच्या खेळीच्या जोरावर व्हीआयटी पुणे संघाने केवळ ८.४ षटकांत सहज पूर्ण केले.

संक्षिप्त धावफलक : डी.वाय. आकुर्डी : १३ षटकांत ५ बाद १०४ (शिवम के. मिश्रा ४० – २४ चेंडू, अंकुर शर्मा २३ – २१ चेंडू; रोहित लक्कास २/२०, संस्कार बब्बे २/२५) वि.वि. एमआयटी एडीटी एसओसी ब : १३ षटकांत ६ बाद ८७ (ओंकार गोडसे* ३१ – २५ चेंडू; यश उंबरे ३/१६) सामनावीर : यश उंबरे.

एसबी पाटील आर्किटेक्चर महाविद्यालय : १७ षटकांत ९ बाद ११३ (आर्यन निलेश १९, हर्षल भेगडे १७; आदित्य राऊत २/२२, ऋषी चोरडिया २/२४) वि.वि. एटीएसएस : ११.५ षटकांत ४ बाद ११७ (रोहित बनसोडे* ३० – २२ चेंडू, सुजित आवटे* १९ – १० चेंडू) सामनावीरः सुजित आवटे.

सूर्यदत्त बावधन : ११.४ षटकांत सर्वबाद ७७ (धीरज प्रवीण अहिरे १९, संस्कार गायकवाड १५; सिद्धांत महाजन २/७, अथर्व करोडे २/९, सोहम व्यवहारे २/१६) वि.वि. व्हीआयटी पुणे : ८.४ षटकांत ३ बाद ८१ (आदी नेने* २६ – २६ चेंडू, सोहम कदम २५ – १७ चेंडू) सामनावीरः अथर्व करोडे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बोगस व्होटिंग: हडपसरमध्ये दोन हजार लोक पकडल्याची केंद्रीय मंत्र्यांची माहिती

पुणे – पुणेकरांनी मागील निवडणुकीत कारभारी बदलण्याचा स्पष्ट संदेश...

निवडणूक आयोगाची शाई सुकली की निघत नाही:मार्कर 2011 चा , तर ‘पाडू’चा 2004 पासून वापर; आयुक्त दिनेश वाघमारेंचा दावा

मुंबई-महापालिका निवडणुकीत मतदारांच्या बोटाला लावण्यात येणारी शाई पुसली जात...

बोटावरील शाई द्रवाने पुसून पुन्हा मतदान होत असल्याची महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची आयोगाकडे तक्रार

पुणे-महानगरपालिका निवडणुकांमध्ये मतदानानंतर बोटावर लावल्या जाणाऱ्या शाईऐवजी वापरल्या जाणाऱ्या...

प्रभाग २६ मधील सेंट हिल्डाज शाळेत ईव्हीएम चार वेळा बंद,डॉ. नीलम गोऱ्हेंनी घेतली दखल, अतिरिक्त मशीन ठेवण्याच्या सूचना

पुणे. दि.१५: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग क्रमांक २६...