पुणे, १४ जानेवारी, २०२६ – पुण्यातील आघाडीच्या रिअल इस्टेट कंपनी कोलते-पाटील डेव्हसपर्स लिमिटेडने(BSE: 532924, NSE: KOLTEPATIL) नव्या रहिवासी प्रकल्पाची घोषणा केली आहे. पुण्यातील भूगाव येथे सुमारे ११ लाख चौरस फूट क्षेत्राच्या भव्य रहिवासी प्रकल्पासाठी कंपनीने संयुक्त विकास करार केल्याची घोषणा केली आहे. कोलते-पाटील डेव्लपर्स लिमिटेडने मुंबई आणि बंगळुरु येथेही मोठ्या प्रमाणात प्रतिथियश प्रकल्पांची उभारणी केली आहे. पुणे येथील भूगाव येथे उभारल्या जाणा-या या महत्त्वकांक्षी प्रकल्पाचे एकूण अंदाजित विकास मूल्य हे सुमारे ८५० कोटी रुपये असून, या नवीन भागीदारीमुळे कोलते-पाटील समूहाच्या पुण्यातील गृहनिर्माण बाजारपेठेतील प्रभाव अधिक मजबूत होणार आहे.
पुणे येथील भूगाव हे वेगाने विकसित होणारे रहिवासी क्षेत्र म्हणून उदयास येत आहे. या भागांत निसर्गरम्य वातावरण आणि आधुनिक नागरी सुविधांचा उत्कृष्ट संगम पाहायला मिळतो. कोथरुड आणि बावधनसारख्या प्रगत परिसरांच्य सानिध्यात असलेला हा भूखंड पुणे-मुंबई द्रूतगती मार्ग आणि शिवाजीनगर रेल्वे स्थानकाशी जोडलेला आहे. हा भूभाग मोठमोठ्या रोजगार केंद्रांच्याजवळ आहे. शाळा, अद्यायावत रुग्णालये, शॉपिंग मॉल्स, मनोरंजनाची ठिकाणे यांसारख्या प्रगत आणि सामाजिक पायाभूत सुविधांच्या सहज उपलब्धतेमुळे हा प्रकल्प घर खरेदीदारांसाठी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो. हा निवासी प्रकल्प अनेकांसाठी आकर्षक संधी ठरेल, असे बोलले जात आहे.
या प्रकल्पाची माहिती देताना कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश पाटील म्हणाले, ‘‘प्रकल्पांची मागणी असलेल्या आणि उच्च क्षमता उप-बाजारपेठांमध्ये कंपनीचे स्थान भक्कम करण्यासाठी हा प्रकल्प अनुकूल आहे. हा व्यवहार कंपनीच्या या विकास धोरणाशी सुसंगत आहे. भूगावमधील हा प्रकल्प भांडवल-कार्यक्षम भागीदारीच्या माध्यमातून आमचा व्यवसाय विस्तारण्याच्या दिशेने टाकलेले आगामी महत्त्वाचे पाऊल आहे. आम्ही आमच्या ग्राहकांसाठी सर्व आधुनिक सोयीसुविधांनीयुक्त आणि जागतिक दर्ज्याची निवासस्थाने निर्माण करण्यास कटिबद्ध आहोत. या प्रकल्पांमुळे ग्राहकांना कायमस्वरुपी उत्तम मूल्य मिळेल. आमच्या ब्रँण्डची विश्वासार्हता आणि बाजारातील प्रदीर्घ अनुदानाचा प्रभावी वापर करुन पुण्याच्या नागरी विकासाला हातभार लावणारा आणि आजच्या घर खरेदीदारांच्या आकांक्षा पूर्ण करणारा एक विचारपूर्वक नियोजित प्रकल्प उभारण्याचे ध्येय साध्य करत आहोत.’’

