– या अत्यंत आकर्षक लक्झरी एसयूव्हीचे स्थानिक उत्पादन सुरू करणारी अमेरिकेबाहेरची भारत ही पहिली बाजारपेठ
– पहिल्यांदाच मर्सिडीज–मेबैकसाठी भारताचा आघाडीच्या 5 जागतिक बाजारपेठांच्या यादीत समावेश
– मर्सिडीज–बेंझने 2025 मध्ये 19,007 नवीन कार्सची विक्री केली; TEV सेगमेंटमध्ये 11% वाढ, BEVs मध्ये 12% वाढ; महसुलाच्या दृष्टीने ‘आतापर्यंतचे सर्वोत्तम वर्ष’ म्हणून नोंद
– AMG पोर्टफोलिओमध्ये 34% भक्कम वाढ; AMG G63, AMG CLE53 आणि AMG GLC43 यांना मिळालेल्या मागणीमुळे वाढ
– भारतामध्ये विक्री झालेल्या सर्व टॉप–एंड मर्सिडीज–बेंझ वाहनांपैकी 20% BEVs आहेत. 2025 मध्ये विक्री झालेल्या एकूण मर्सिडीज–BEVs पैकी 70% वाहनांची किंमत 1.25 कोटी रू. ते 3.10 कोटी रु. दरम्यान होती. त्यातून लक्झरी विभागामध्ये टॉप–एंड BEVs साठी ग्राहकांची ठोस पसंती अधोरेखित होते. EQS मेबैक SUV, G580 आणि EQS SUV यांना उच्च मागणी दिसून आली.
– मर्सिडीज–बेंझ इंडिया 2026 ची सुरुवात 4.10 कोटी रु. किमतीच्या मर्सिडीज–मेबैक GLS ‘सेलिब्रेशन एडिशन’ सादर करून करत आहे. मर्सिडीज–बेंझने EQS SUV ‘सेलिब्रेशन एडिशन’ देखील सादर केली असून त्याची किंमत 1.34 कोटी रु. (5-सीटर) आणि 1.48 कोटी रु. (7-सीटर) इतकी आहे. या एडिशन्स भारतातील मर्सिडीज–मेबैक GLS SUV आणि EQS SUV चे प्रचंड यश साजरे करत आहेत.
– मर्सिडीज–बेंझ ‘MB.चार्ज पब्लिक’ सुरू करत असून, हे 37 देशांमध्ये उपलब्ध असलेल्या सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक प्रस्थापित सार्वजनिक चार्जिंग नेटवर्कपैकी एक आहे. हे नेटवर्क चार्जिंग पॉइंट शोधण्यापासून ते पेमेंट प्रक्रियेपर्यंत संपूर्ण एंड–टू–एंड एकात्मिक सेवा एका सिंगल इकोसिस्टममध्ये ग्राहकांना उपलब्ध करून देते. ही सेवा 9,000 हून अधिक DC चार्जिंग पॉइंट्सवर सध्याच्या सर्व मर्सिडीज–बेंझ BEV ग्राहकांसाठी कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय उपलब्ध असेल.
ग्राहकांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी मर्सिडीज–बेंझ इंडिया विक्री आणि ग्राहक प्रवास सुलभ करून ‘1 ग्राहक युनिट’ संकल्पना राबवत आहे. लवकरच भारतात सादर होणाऱ्या अनोख्या ‘थ्री क्लिक्स टू फायनान्स’ उत्पादनाची झलक देण्यात आली.
– मर्सिडीज–बेंझ इंडिया आपला पहिलावहिला ‘Sustainability Compendium Report 2026’ सादर करत असून, कंपनी राबवत असलेल्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम घडविणाऱ्या विविध कॉर्पोरेट सदस्यत्व उपक्रमांना अधोरेखित करते.
“आम्ही महसुली वाढीच्या दृष्टीने आणखी एक सर्वोत्तम वर्ष गाठले आहे. जाणकार ग्राहकांमध्ये असलेल्या उच्च पसंतीमुळे TEV सेगमेंट तसेच टॉप-एंड BEVs मध्ये झालेल्या मजबूत वाढीतून हे स्पष्ट होते. ‘प्रमाण आणि संख्येच्या जोडीला मूल्यवर्धित सेवा’ या धोरणावर लक्ष केंद्रित करताना आणि उच्च उत्पादन मूल्य देताना आम्ही ग्राहक अनुभव केंद्रस्थानी ठेवतो, तसेच ग्राहकांना वैशिष्ट्यांनी परिपूर्ण उत्पादने आणि त्यांच्या मर्सिडीज-बेंझ वाहनांसाठी उच्च Residual Value मिळत राहील याची खात्री करतो.”
“2026 हे 12 नवीन उत्पादनांचे सादरीकरण, आमच्या स्थानिक उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार, MB.Charge Public ची सुरूवात, नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश आणि संपूर्ण नेटवर्कच्या उन्नतीसाठी गुंतवणुकीसह अत्यंत गतिमान वर्ष असेल.”
“मर्सिडीज-मेबैक GLS चे स्थानिक उत्पादन सुरू करण्याचा निर्णय भारतीय ग्राहकांप्रती मर्सिडीज-बेंझची दृढ बांधिलकी पुन्हा अधोरेखित करतो. त्यायोगे ‘मेड इन इंडिया’ सर्वोच्च लक्झरी SUV सादर केली जात आहे. भारत आता मर्सिडीज-मेबैकच्या अग्रणी 5 जागतिक बाजारांमध्ये स्थान मिळवत आहे. यातून टॉप-एंड वाहनांवर असलेले आमचे ठाम लक्ष दिसून येते आणि आम्हाला सर्वाधिक आकर्षक लक्झरी ऑटोमोटिव्ह ब्रँड बनवते. स्थानिक उत्पादनामुळे वाहनाचे आकर्षण अधिक वाढेल, तसेच आमची जागतिक दर्जाची उत्पादन क्षमता आणि गतिशीलता अधोरेखित होईल. त्यातून अशा अत्यंत खास टॉप-एंड वाहनांसाठी सर्वात मागणी असलेल्या ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करता येतील.”
– मर्सिडीज–बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष अय्यर
पुणे: भारतातील सर्वाधिक आकर्षक लक्झरी कार निर्माता मर्सिडीज-बेंझने आज 2025 साठी मजबूत विक्री कामगिरीची घोषणा केली. मुख्य विभागात मिळालेले यश आणि AMG तसेच BEV पोर्टफोलिओसह टॉप-एंड वाहनांना मिळालेल्या प्रचंड मागणीमुळे ही कामगिरी साध्य झाली. संपूर्ण पोर्टफोलिओमध्ये मर्सिडीज-बेंझ उत्पादनांनी ग्राहकांची पसंती आणि विश्वास कायम राखला.
2025 विक्री कामगिरीतील ठळक बाबी:
· मर्सिडीज-बेंझ इंडियाने वर्ष 2025 मध्ये 19,007 युनिट्स वितरित केली (वर्ष 2024 मध्ये 19,565 युनिट्स). महसुलाच्या दृष्टीने आतापर्यंतचे सर्वोत्तम वर्ष.
· विशेष S-Class, मर्सिडीज-मेबैक आणि AMG यांचा समावेश असलेल्या टॉप-एंड व्हेईकल्स (TEV) पोर्टफोलिओने 11% वार्षिक वाढ आणि 25% विक्री प्रवेशासह उत्कृष्ट स्थैर्य दाखविले.
· उच्च कार्यक्षमतेच्या AMG पोर्टफोलिओमध्ये 34% वार्षिक भक्कम वाढ झाली. यातून AMG परफॉर्मन्स वाहनांच्या विस्तृत श्रेणीसाठी वाढती आकांक्षा दिसून येते
· मर्सिडीज-बेंझ इंडियाच्या BEV पोर्टफोलिओने 12% वार्षिक वाढीसह गती कायम राखली, तसेच भारतात विक्री झालेल्या सर्व टॉप-एंड मर्सिडीज-बेंझ वाहनांपैकी 20% हिस्सा BEVs चा आहे
· 2025 मध्ये विक्री झालेल्या एकूण मर्सिडीज-बेंझ BEVs पैकी 70% टॉप-एंड सेगमेंटमधील असून त्यांची किंमत 1.25 कोटी रु. ते 3.1 कोटी रु. दरम्यान आहे. टॉप-एंड BEVs मध्ये EQS SUV, EQS Sedan, मर्सिडीज-मेबैक EQS SUV आणि मर्सिडीज-बेंझ G580 यांचा समावेश आहे.
· लॉंग व्हीलबेस E-Class ने आपल्या विभागामध्ये आघाडी कायम राखली असून ‘भारताची सर्वाधिक पसंतीची आणि सर्वाधिक विक्री होणारी लक्झरी कार’ म्हणून मजबूत ग्राहक निष्ठा टिकवली आहे.
· EQS SUV ही भारतातील मर्सिडीज-बेंझची सर्वाधिक विक्री होणारी लक्झरी BEV आहे
· Entry luxury, Core आणि Top-End यांचे एकूण वर्ष 2025 विक्रीत अनुक्रमे 13%, 62% आणि 25% योगदान होते.
· C-Class, LWB E-Class, S-Class आणि मर्सिडीज-मेबैक S-Class लिमोझिन्सना सतत मिळालेल्या मागणीमुळे मर्सिडीज-बेंझ सेदान पोर्टफोलिओने विक्रीत भक्कम योगदान दिले.
· GLA, GLC, GLE, GLS, मर्सिडीज-मेबैक GLS आणि वैशिष्ट्यपूर्ण AMG G63 SUV यांचा समावेश असलेल्या संपूर्ण SUV पोर्टफोलिओला वाढती मागणी मिळाल्यामुळे SUV विभागाने मजबूत कामगिरी केली.
· मर्सिडीज-बेंझच्या ‘Entry Luxury’ पोर्टफोलिओमध्ये वर्षभरात 20% घट झाली असून, एकूण विक्रीतील वाटा 13% पर्यंत घसरला. उत्पादनाच्या दर्जावर तडजोड न करणे आणि बाजारातील किंमत स्पर्धेत सहभागी न होणे या ब्रँडच्या धोरणाशी ही बाब सुसंगत आहे.
मर्सिडीज-बेंझ 2026 मध्ये 12 नवीन उत्पादने सादर करणार
2026 मध्ये मर्सिडीज-बेंझ भारतासाठी 12 नवीन कार्सची योजना आखत आहे. यामध्ये नवीन मॉडेल्स तसेच एखाद्या नवीन मॉडेलच्या आधीची जुनी आवृत्ती नसलेल्या कार्सचा समावेश असेल. तसेच फेसलिफ्ट्स म्हणजेच एखाद्या विद्यमान मॉडेलमध्ये केलेले डिझाइन आणि फीचर्समधील सौम्य बदल किंवा अद्ययावत रूपही सादर करण्यात येईल. या पैकी अनेक उत्पादने टॉप एंड व्हेईकल्स आणि नवीन BEVs असतील.
ही उत्पादनांची भव्य मालिका उत्कृष्ट उत्पादने, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सर्वोत्तम अनुभवांची अपेक्षा असलेल्या बदलत्या ग्राहकवर्गासाठी मर्सिडीज-बेंझची दृढ बांधिलकी पुन्हा अधोरेखित करते. मर्सिडीज-बेंझ बहुप्रतिक्षित CLA BEV चे सादरीकरण करणार असून त्यामध्ये MB.OS सादर केले जाईल.
मर्सिडीज-मेबैक GLS: अल्ट्रा-लक्झरी एसयूव्हीचे स्थानिक उत्पादन
मर्सिडीज-बेंझ इंडियाने पुण्यातील आपल्या जागतिक दर्जाच्या उत्पादन केंद्रात मर्सिडीज-मेबैक GLS चे स्थानिक उत्पादन सुरू करण्याची घोषणा केली आहे. भारतातील ब्रँडच्या उत्पादन क्षमतेतील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा असून, अमेरिकेबाहेर अल्ट्रा-लक्झरी मर्सिडीज-मेबैक GLS चे स्थानिक उत्पादन सुरू करणारी भारत ही पहिली बाजारपेठ ठरणार आहे.
हा निर्णय मर्सिडीज-मेबैकसाठी अग्रणी 5 जागतिक बाजारपेठांपैकी एक म्हणून भारताचे धोरणात्मक महत्त्व अधिक बळकट करतो. टॉप-एंड अल्ट्रा-लक्झरी वाहनांची मागणी सातत्याने वाढत असल्याचे यातून दिसून येते. स्थानिक उत्पादनामुळे जलद डिलिव्हरी वेळापत्रक शक्य होईल तसेच चाकांवरच्या या सर्वोच्च कारागिरीपर्यंत ग्राहकांचा प्रवेश अधिक सुलभ होईल.
जून 2021 मध्ये भारतात पदार्पण केल्यापासून, मर्सिडीज-मेबैक GLS ने देशातील अत्यंत आकर्षक, मागणी असलेली एसयूव्ही म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. लक्झरी एसयूव्ही स्वरूपात अंतिम मर्सिडीज-मेबैक अनुभव शोधणाऱ्या प्रतिष्ठित ग्राहकांकडून या वाहनाला सातत्याने मजबूत मागणी मिळत आहे. सध्या हे अल्ट्रा-लक्झरी वाहन भारतात CBU (Completely Built Unit) इमपोर्ट स्वरूपात विक्रीस उपलब्ध आहे.
MB.CHARGE Public: एकसंध चार्जिंग इकोसिस्टम
मर्सिडीज-बेंझ इंडियाने ‘MB.CHARGE Public’ ही सर्वसमावेशक डिजिटल सेवा सादर केली असून, मर्सिडीज-बेंझ अॅप आणि RFID कोडच्या माध्यमातून भारतभरातील सर्व मर्सिडीज-बेंझ ईव्ही ग्राहकांना एकसंध चार्जिंग नेटवर्कमध्ये प्रवेश मिळतो. या सेवेमध्ये अनेक चार्जिंग भागीदारांचे एकत्रीकरण, रिअल-टाइम चार्जर उपलब्धता, अखंड, विनाअडथळा पेमेंट सोल्युशन्स आणि आतापर्यंत केलेल्या चार्जिंगचा लेखाजोखा ट्रॅकिंगचा समावेश आहे. ग्राहकांनी त्यांच्या विद्यमान Mercedes me ID च्या माध्यमातून मर्सिडीज-बेंझ अॅप किंवा OneWeb पोर्टलवर ‘MB.CHARGE Public’ आणि ‘Display of charging station services’ सक्रिय करणे आवश्यक आहे.
MB.CHARGE Public हे जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक प्रस्थापित सार्वजनिक चार्जिंग नेटवर्कपैकी एक असून मर्सिडीज-बेंझ ग्राहकांना खऱ्या अर्थाने जागतिक चार्जिंग इकोसिस्टममध्ये अखंड सामावून घेत आहे. 350,000 हून अधिक सक्रिय वापरकर्ते आणि जगभरात 3.3 दशलक्षपेक्षा अधिक चार्जिंग पॉइंट्ससह या नेटवर्कने विविध बाजारपेठांमध्ये आपला विस्तार, विश्वासार्हता आणि ग्राहक स्वीकारार्हता सिद्ध केली आहे. आज MB.CHARGE Public 37 देशांमध्ये उपलब्ध असून, ग्राहक जिथे जिथे प्रवास करतात तिथे व्यापक उपलब्धता आणि एकसारखा चार्जिंग अनुभव देते.
MB.CHARGE Public ग्राहकांना चार्जिंग पॉइंट शोधण्यापासून ते पेमेंट प्रक्रियेपर्यंत संपूर्ण एंड-टू-एंड एकात्मिक प्रवाह एकाच परिसंस्थेमध्ये पुरविते. मर्सिडीज-बेंझने Jio BP, Chargezone, Chargemod, Zeon charging तसेच सर्व मर्सिडीज-बेंझ डीलरशिप चार्जर्ससह अनेक चार्ज पॉइंट ऑपरेटर्ससोबत भागीदारी केल्यामुळे, ग्राहक आता भारतातील 9000 हून अधिक DC चार्जिंग पॉइंट्सवर आपली ईव्ही चार्ज करू शकतात.
या सेवेमध्ये चार्जिंगपूर्वी मर्सिडीज-बेंझ अॅपद्वारे किंवा MB.CHARGE Public RFID कार्डद्वारे सुलभ प्रमाणीकरण पर्याय उपलब्ध आहेत. प्रति kilowatt-hour अचूक किंमत तसेच कमाल चार्ज पातळीपर्यंत पोहोचण्यासाठीचा अंदाजे खर्च दर्शविला जातो. प्रत्येक चार्जिंग सत्र पूर्ण झाल्यानंतर पेमेंट लिंकद्वारे एसएमएस आणि ई-मेलवर आपोआप बिल पाठविले जाते. ग्राहक क्रेडिट/डेबिट कार्ड्स, सर्व UPI अॅप्ससह सर्व पेमेंट पर्यायांचा वापर करून सोयीस्करपणे पेमेंट करू शकतात.
2026 मध्ये 30 नवीन लक्झरी टचपॉइंट्स
मर्सिडीज-बेंझ इंडिया 2026 मध्ये 3 नवीन बाजारपेठांत 15 नवीन लक्झरी टचपॉइंट्स सुरू करून आपले स्थान वाढवणार आहे, तसेच नवीन आर्किटेक्चर मानकांनुसार 15 विद्यमान टचपॉइंट्स उंचावणार आहे. मर्सिडीज-बेंझ रिटेल नेटवर्क जागतिक दर्जाचे राहील हे सुनिश्चित करत मर्सिडीज-बेंझ फ्रँचायझी भागीदार 450 कोटी रु. पेक्षा अधिक गुंतवणूक सुरू ठेवतील.
विक्री आणि ग्राहक प्रवास सुलभीकरण: ‘1 कस्टमर युनिट’ अनुभव | 3 क्लिक्स टू फायनान्स
मर्सिडीज-बेंझ इंडियाने विक्री आणि ग्राहक प्रवास कार्ये यशस्वीपणे सुलभ करून ‘1 कस्टमर युनिट’ तयार केले आहे. ते विक्री, सेवा आणि वित्तपुरवठा या सर्वांमध्ये अखंड ग्राहक अनुभव पुरविते. हे धोरणात्मक सुलभीकरण ग्राहकांना एका सिंगल टचपॉइंटवरून सर्वसमावेशक ऑटोमोटिव्ह सोल्युशन्स मिळवून देते. ग्राहककेंद्री दृष्टीकोनाप्रती मर्सिडीज-बेंझची बांधिलकी प्रतिबिंबित करत त्यातून धोरणात्मक उद्दिष्टांची उत्तम सुसंगती, बंडल्ड ऑफरिंग्ससाठी जलद गो टू मार्केट आणि अधिक कार्यक्षम स्त्रोत वापर शक्य होतो.
ग्राहकांकरिता, वाहन निवड आणि वित्तपुरवठ्यासाठी अनेक टचपॉइंट्सवर जाण्याऐवजी आता एकाच विंडोमधून सेवा मिळणार असून, पहिल्याच संवादापासून खरेदी प्रवासात सानुकूल आर्थिक उपाय एकत्रित केले जातील.
या एकसंध चौकटीमुळे वाहन वित्तपुरवठा, विमा, विस्तारित वॉरंटी आणि सेवा योजना यांचा समावेश असलेली अधिक वैयक्तिकृत ओनरशिप पॅकेजेस शक्य होतील. प्रत्येक ग्राहकाच्या गरजांनुसार डिझाइन केली जातील. परिणामी, लक्झरी कार मालकीकडे जाणारा प्रवास अधिक सुलभ आणि सोयीस्कर बनत जलद प्रक्रिया, सुसंगत संवाद आणि थ्री-पॉइंटेड स्टारच्या वैशिष्ट्यपूर्ण मानकांचे प्रतिबिंब असलेला एकसारखा ब्रँड अनुभव मिळेल.
3 क्लिक्स टू फायनान्स:
मर्सिडीज-बेंझ इंडिया कंपनी आपल्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन रोडमॅपचा भाग म्हणून, अधिकृत ‘golden source’ डेटाबेसेसद्वारे प्रमाणीकरणासह पूर्णपणे डिजिटल, ग्राहक-प्रणीत ऑनबोर्डिंग प्रवास तयार करत आहे. या उपक्रमामुळे डेटाची अचूकता आणि नियामक अनुपालन वाढेल, काम पूर्ण होण्यास लागणारा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होईल आणि ग्राहकांसाठी अखंड, विनाअडथळा, सहज आणि समजण्यास सोपा अनुभव मिळेल.

