मतदानाकरिता मतदानादिवशी सुट्टी-कामगार उपआयुक्त निखील वाळके

Date:

पुणे, दि. 13 : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५-२६ करीता मतदारांना मतदानाचा हक्क बजाविण्याकरिता १५ जानेवारी २०२६ रोजी कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनानी भरपगारी सुट्टी तथा सुट्टी देणे शक्य नसल्यास सवलत देण्यात यावी, असे आवाहन कामगार उपआयुक्त निखील वाळके यांनी केले आहे.

उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या ३० डिसेंबर २०२५ रोजीच्या परिपत्रकानुसार कामगार विभागांतर्गत येणा-या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने (उदा खाजगी कंपन्यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स आदी.) मधील कार्यरत अधिकारी, कर्मचारी, कामगार यांना भरपगारी सुट्टी देण्यात यावी तसेच अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तेथे दोन ते तीन तासांची सवलत देण्याबाबत सूचित केले आहे.

कामगार विभागातंर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने व दुकाने मालकांनी, व्यवस्थापनाने परिपत्रकातील निर्देशाचे तंतोतंत पालन करण्याची खबरदारी घ्यावी. आपल्या आस्थापनेतील अधिकारी, कर्मचारी, कामगार यांच्याकडून मतदानाकरीता भरपगारी सुट्टी अथवा सवलत न मिळाल्याची तक्रार कामगार कार्यालयास प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनेविरुध्द निवडणूक आयोग व शासनाने निर्देशित केल्यानुसार कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

जिल्ह्यातील सर्व आस्थापना, कारखाने व दुकाने यामध्ये काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, कामगार यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील निवडणूकीच्या दिवशी मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी अथवा सवलत न दिल्यास अपर कामगार आयुक्त यांचे कार्यालय, पुणे विभाग व कामगार उप आयुक्त कार्यालयाच्या alcpune5@gmail.com व dycl2021@gmail.com या ई-मेल पत्त्यावर आस्थापनेचे नाव, जबाबदार अधिकाऱ्यांचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करुन तक्रार दाखल करावी.

यासंदर्भात अधिक माहिती व तक्रारीकरिता सहाय्यक कामगार आयुक्त प्रविण बा. जाधव – ९५२९६११८०७, ग. स. शिंदे-९७३०१२११५२, द. दा. पवार- ९८२२७३३३७०. सु. तु. शिर्के- ७७७५९६६६०६, कै. ल. मुजमुले-९८२३९९७७२२ आणि अधीक्षक व. पं. सोनंदकर-९९६०५५७११६ यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन कामगार उपआयुक्त निखील वाळके यांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मोदींनी ओमानवरील हल्ल्याचा निषेध केला:8 आखाती देशांशी चर्चा, दुबई आणि अबू धाबीहून 2000+ भारतीय परतले

नवी दिल्ली- पंतप्रधान मोदींनी सोमवारी भारतीय समुदायाच्या लोकांच्या सुरक्षेबाबत...

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन इराणशी चर्चा करणार:मध्य पूर्वेतील देशांवरील हल्ले रोखणे हे उद्दिष्ट

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन इराणशी चर्चा करणार आहेत. मंगळवारी...

२८ आणि २९ मार्चला महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन

चौथ्या विजेतेपदासाठी भाग्यश्री फंड उत्सुक ४२ जिल्ह्यांच्या संघांचे ४००हून अधिक...

चंद्रकांतदादा पाटील यांची सीआयएसएफच्या जवानांसोबत होळी साजरी

जवानांच्या चेहऱ्यावरचा निखळ आनंद पाहून मन समाधानाने भरुन आले-...