पुणे- पुण्याच्या विकासाचा सुवर्णकाळ काँग्रेसने निर्माण केला मात्र २०१७ नंतर सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाने पुण्याला नागरी समस्यांचे शहर बनवले. वाहतूक कोंडी हा तर जीवघेणा अनुभव प्रत्येक पुणेकर रोज अनुभवत आहे, त्यामुळे पुणे शहर यावेळेस नक्की परिवर्तन करणार असून भाजपाला सत्तेवरून काढून काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठ्या मताधिक्याने विजयी करतील असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी आज बिबवेवाडी येथे झालेल्या रॅली व प्रचार सभेत समारोप प्रसंगी म्हटले
काँग्रेस पक्षाचे उमेदवार मोहन चव्हाण, रूपाली बिबेवे, संजय बवले यांच्या प्रचारार्थ आयोजित रॅली व सभेत ते बोलत होते.
याप्रसंगी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पक्षाचे झेंडे, पंजा आणि मशाल यांच्या प्रतिकृती, फटाक्यांची आतिषबाजी, घोषणांचा गगनभेदी आवाज यामुळे सारे वातावरण भारून गेले होते. यावेळी काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुणेकर आता परिवर्तन करणार – मोहन जोशी
Date:

