पुणे : गेल्या दहा दिवसांत भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेले परिश्रम, घरोघरी पोहोचलेला प्रचार आणि नागरिकांकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद यामुळे प्रभाग क्रमांक २५ – शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई परिसरात पुणे शहरातील सर्वात मोठ्या विजयाचा विश्वास भाजपाचे उमेदवार राघवेंद्र बाप्पू मानकर यांनी व्यक्त केला. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी आयोजित भव्य बाईक रॅलीदरम्यान ते बोलत होते.
भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक ताकद मोठी आहे. या ताकदीच्या जोरावर अवघ्या दहा दिवसांत पक्षाचे कार्यकर्ते घराघरांत पोहोचले. आमदार हेमंतभाऊ रासने यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षातील मंडल अध्यक्ष, सर्व आघाड्यांचे प्रमुख, प्रभाग अध्यक्ष, बूथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख तसेच सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतल्यामुळे या प्रभागात पुण्यातील सर्वात मोठ्या विजयाचा आम्हाला विश्वास असल्याचे मानकर यांनी सांगितले.
प्रभाग क्रमांक २५ मध्ये भाजपाचे अधिकृत उमेदवार म्हणून राघवेंद्र बाप्पू मानकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक आणि स्वप्नाली पंडित हे निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या प्रचारार्थ आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीला माजी नगरसेवक दिलीप काळोखे, राजेश येनपुरे, माजी नगरसेविका गायत्री खडके, उदय लेले, मंडल अध्यक्ष अमित कंक, शहर चिटणीस मनोज खत्री, मंडल सरचिटणीस निलेश कदम, किरण जगदाळे, संतोष फडतरे, शहर पदाधिकारी प्रणव गंजीवाले, महिला आघाडीच्या मोहना गद्रे, रुपाली कदम, सुरेखाताई पाषाणकर, उज्वलाताई पावटेकर, प्रभाग अध्यक्ष सुनील रसाळ, युवा मोर्चाचे श्रेयस लेले तसेच सर्व भाजपा बूथप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बाप्पू मानकर मित्र परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

