एअर इंडियाचे पहिले बोइंग ७८७-९ विमान दिल्लीत उतरले

Date:

गुरुग्राम, : पहिले लाइन-फिट (एअर इंडियासाठी तयार केलेल्या) बोइंग ७८७-९ विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवून आम्ही २०२६ या नव्या वर्षातील आमच्या परिवर्तनाच्या कहाणीतील नव्या अध्यायाचे स्वागत केले.

विमानातील कॉकपिटमधील एअर इंडियाच्या चार वैमानिकांच्या चमूने बोइंगच्या वॉशिंग्टन स्टेटमधील एव्हरेट कारखान्यापासून नवी दिल्लीपर्यंत १६ तास ५८ मिनिटांचा विनाथांबा प्रवास केला. यामुळे केवळ नव्या विमानाचे आगमन झाले इतकेच नाही, तर एअर इंडिया या आमच्या विमान कंपनीची जागतिक दर्जाच्या उड्डाण अनुभवाबाबत असलेली कटिबद्धताही यामुळे अधोरेखित झाली.

नव्या विमानाची नोंदणी व्हीटी-एडब्ल्यूए अशी आहे. विमानात बिझनेस, प्रीमियम इकॉनॉमी आणि इकॉनॉमी अशा तीन प्रवर्गांतील बैठक व्यवस्था असून, एकूण २९६ जागा आहेत. या जागांची अंतर्गत रचना बोइंगच्या उत्पादनस्थळीच मागणीनुरूप करण्यात आली असून, त्याचे तपशील येत्या काही आठवड्यांत जाहीर केले जातील.

बदलाच्या वर्षाची सुरुवात

या वर्षात होऊ घातलेल्या अनेकानेक नवनव्या गोष्टींची ही केवळ सुरुवात आहे. २०२६ या वर्षात आत्ता ताफ्यात दाखल झालेल्या व्हीटी-एडब्ल्यूए विमानासह एकूण सहा मोठ्या आकाराची (एअरबस ए ३५०-१००० आणि बोइंग ७८७-९) विमाने दाखल होणार आहेत. बोइंग ७८७-९ मधील जागांची रचना ही आमच्या बोइंग ७८७ ताफ्यासाठीचा नवा सर्वोच्च निकष बनणार आहे. याच धर्तीवर एअर इंडियाच्या सध्याच्या २६ बोइंग ७८७-८ विमानांत टप्प्याटप्प्याने बदल होतील. हा कार्यक्रम व्यवस्थित सुरू असून, बहुतांश विमानांतील ही बदल प्रक्रिया संपत आली आहे. ही विमाने २०२६ मध्ये नखशिखान्त ताज्या बदलांसह सेवेत परततील. त्यात नव्या एअर इंडिया नाममुद्रेचाही समावेश असेल. याचा अर्थ, या वर्षअखेरीस आमच्या मोठ्या आकाराच्या सुमारे ६० टक्के विमानांतील अंतर्गत रचना आधुनिक असेल.

व्यावसायिक तैनात

नवीन बोइंग ७८७-९ विमान फेब्रुवारी २०२६ मध्ये आंतरराष्ट्रीय व्यावसायिक सेवेसाठी उपलब्ध होईल. याचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच रेड्डी, ओबेरॉय यांना डी.लिट:टिळक विद्यापीठाचा 44 वा पदवीप्रदान सोहळा

पुणे- टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत,...

आला उन्हाळा; आपले आरोग्य सांभाळा

सध्या सर्वत्र तापमान वाढत असून, उष्णतेच्या लाटेकडे दुर्लक्ष करू...