जुहूच्या ३५ हजार नागरिकांनी जाहीर केला मतदानावरील बहिष्कार ….लावले फलक .

Date:

मॅचाफिक्सिंग च असेल तर मतदान कशाला करायचे ?35 वर्षांपासून इथल्या 200 धोकादायक इमारती आणि दोन झोपडपट्टी विकासापासून रखडल्या त्याकडे दुर्लक्ष निवडणुकीपूर्वी मिळते आश्वासन नंतर धत्तुरा …

मुंबई-महापालिका निवडणूक तोंडावर असताना मतदानासाठी जनजागृती देखील केली जात आहे. परंतु, मुंबईच्या जुहू भागातील सुमारे 35 हजार नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे जाहीर केले आहे.मुंबईच्या जुहू परिसरातील जवळपास 200 इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे जाहीर केले आहे. मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याच्या आशयाचे बॅनर जुहू रुईया पार्क, कराची सोसायटी परिसरात लावण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.

जुहू परिसरात असलेल्या मिलिटरी रडारमुळे नागरिकांना फटका बसत असल्याचे चित्र आहे. गेल्या 35 वर्षांपासून इथल्या 200 धोकादायक इमारती आणि दोन झोपडपट्टी विकासकापासून रखडल्या आहेत. या इमारतींचे पुनर्विकास होऊ शकत नसल्याने जवळपास 35 हजार लोक धोकादायक इमारतींमध्ये भीतीच्या सावटाखाली राहतात असा दावा करण्यात आला आहे. येथील नागरिकांनी त्यांच्या समस्या केंद्र सरकारच्या संरक्षण विभागासमोर मांडल्या. अनेकदा त्याचा पाठपुरावा करूनही यश आले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

जुहू परिसरातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकताना सर्वत्र बॅनर लावले आहेत. यावर असे लिहिले आहे की, एसआरओ 150 कायदा कालबाह्य आहे आणि त्यामुळे घरे उद्ध्वस्त होत आहेत. 1939 च्या ब्रिटिश कायद्यांतर्गत आम्हाला आमच्या कायदेशीर घरांमधून हाकलण्यात आले आहे. सुमारे 200 इमारती आणि दोन मोठ्या झोपडपट्ट्या धोक्यात असून इथल्या 35 हजार नागरिकांवर अन्याय होत आहे. त्यामुळे मतदानासाठी बाहेर पडण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा आणि पुन्हा विचार करा. यापुढे खोटी आश्वासने आता चालणार नाहीत.लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत नेत्यांनी त्यांच्या प्रश्नावर निवडणुकीनंतर तोडगा काढणार असे आश्वासन दिले होते. मात्र, निवडणुकीनंतर कोणताहीह नेता मदत करत नसल्याचे सांगत येथील नागरिकांनी महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला आहे.

जुहूच्या रुईया पार्क आणि कराची सोसायटी परिसरात मतदानावर बहिष्कार टाकल्याचे अनेक बॅनर दिसून आल्यानंतर प्रभाग क्रमांक 68 मधील मनसेचे उमेदवार संदेश सरदेसाई यांनी येथील नागरिकांची भेट घेतली. तसेच निवडणुकीनंतर दोन्ही ठाकरे बंधूंची भेट घालून, या प्रश्नाचा पाठपुरावा करू आणि योग्य तोडगा काढू, असे आश्वासन देण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मोदींनी ओमानवरील हल्ल्याचा निषेध केला:8 आखाती देशांशी चर्चा, दुबई आणि अबू धाबीहून 2000+ भारतीय परतले

नवी दिल्ली- पंतप्रधान मोदींनी सोमवारी भारतीय समुदायाच्या लोकांच्या सुरक्षेबाबत...

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन इराणशी चर्चा करणार:मध्य पूर्वेतील देशांवरील हल्ले रोखणे हे उद्दिष्ट

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन इराणशी चर्चा करणार आहेत. मंगळवारी...

२८ आणि २९ मार्चला महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन

चौथ्या विजेतेपदासाठी भाग्यश्री फंड उत्सुक ४२ जिल्ह्यांच्या संघांचे ४००हून अधिक...

चंद्रकांतदादा पाटील यांची सीआयएसएफच्या जवानांसोबत होळी साजरी

जवानांच्या चेहऱ्यावरचा निखळ आनंद पाहून मन समाधानाने भरुन आले-...