पुणे- पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ करीता pMPML च्या तब्बल १०५६ बसेस वापरण्यात येणार असल्याने बस ने प्रवास करणारांना २ दिवस जरा कळ काढावी लागणार आहे , सोसावी लागणार आहे . या काळात रिक्षा आणि अन्य प्रवासी वाहनांनी जादा दर आकारणी केल्यास थेट पोलीस आणि RTO त्यांच्यावर कारवाई करणार आहेत .पण पोलीस देखील निवडणुकीच्या बंदोबस्तात असल्याने पुणेकरांची गैरसोय होणार असल्याचे निश्चित आहे.
PMPML ने कळविले आहे कि,’पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ करिता दि. १४/०१/२०२६ रोजी
सकाळपाळीत व दि. १५/०१/२०२६ रोजी दुपारपाळीत पुणे महानगरपालिका यांनी ६४२ बसेस व पिंपरी चिंचवड
महानगरपालिका यांनी ४१४ बसेस अशा एकूण १०५६ बसेसची मागणी केलेली आहे, त्या अनुषंगाने पीएमपीएमएल कडून
१०५६ बसेस देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
सबब पुणे व पिंपरी-चिंचवड शहर, शहरांलगतची उपनगरे व पीएमआरडीए हद्दीतील मार्गांवर बसेसचे प्रमाण कमी
राहणार असल्याने दि. १४/०१/२०२६ रोजी सकाळपाळीत व दि. १५/०१/२०२६ रोजी दुपारपाळीत प्रवाशांची काही
प्रमाणात गैरसोय होऊ शकते. तरी याबाबतची नोंद प्रवाशांनी घ्यावी व परिवहन महामंडळास सहकार्य करावे, असे आवाहन
पीएमपीएमएल कडून करण्यात येत आहे.

