भाजप उमेदवाराला धक्काबुक्कीचा प्रयत्न: 5 जणांवर गुन्हा दाखल

Date:

पुणे- पुण्यातील मंगळवार पेठेत भाजपचे प्रभाग २४ मधील उमेदवार गणेश बिडकर यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना एका वाढदिवसाच्या कार्यक्रमादरम्यान घडली.

आदित्य दीपक कांबळे (वय २४, रा. सदानंदनगर, मंगळवार पेठ) यांनी या संदर्भात फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निनाद धेंडे, संजय भिमाले, प्रदीप कांबळे, भरत शिंदे आणि सागर कांबळे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार पेठेतील भीममगर परिसरात रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी नीलेश आल्हाट यांच्या वाढदिवसानिमित्त १० जानेवारी रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आरोपी आणि भाजप उमेदवार उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान, आरोपींनी भाजप उमेदवारांविषयी अपशब्द वापरले. त्यानंतर आरोपी सागर कांबळे यांनी उमेदवार गणेश बिडकर यांच्या अंगावर धावून जात त्यांना शिवीगाळ केली आणि धक्काबुक्कीचा प्रयत्न केला.यावेळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी सागर कांबळे यांना रोखले. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उत्तम नामावडे आणि उपनिरीक्षक प्रणिल चौगले यांनी घटनास्थळी भेट दिली. उपनिरीक्षक चौगले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान केल्याचा प्रकार उघड

पुणे, दि. 4 मार्च: गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्रे...

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाठिंबा: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई, दि. ४ मार्च २०२६.राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत...

श्री रसिकलाल धारीवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ९वे वार्षिक रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

पुणे- आर. एम. धारीवाल फाउंडेशन तर्फे समाजसेवेची अखंड परंपरा...

मुळा-मुठा नदी प्रदूषणाविरोधात ‘एमआयटी’च्या विद्यार्थ्यांचा एल्गार

नदीपात्रात अवैध कचरा टाकण्याविरोधात विद्यापीठ प्रवेशद्वारावर आंदोलन; आगी व...