बजाज कंपनीकडून ‘डोमिनार ४००’ मोटार सायकलीचे पोलीस दलास हस्तांतरण

Date:

पुणे, दि.१२: ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ करिता बजाज कंपनीकडून पुणे, पिंपरी चिंचवड पोलीस शहर आयुक्तालय आणि पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाकरिता शिवाजीनगर पोलीस मुख्यालय येथे ‘डोमिनार ४००’ या अत्याधुनिक सुविधांनीयुक्त १०० मोटार सायकलीचे शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालय मैदान येथे हस्तांतरण करण्यात आले.

यावेळी पुणे शहरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड शहरचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पुणे शहरचे सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पिंपरी-चिंचवडचे शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजाजन पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, बजाजचे मार्केटिंग विभागाचे अध्यक्ष सुमित नारंग, नवउत्पादन विकास विभागाचे उपाध्यक्ष उदयन शाह आदी उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यात १९ ते २३ जानेवारी दरम्यान होणाऱ्या ‘बजाज पुणे ग्रॅण्ड टूर २०२६’करिता ४३७ कि.मी. अंतराच्या सायकल स्पर्धेच्या मार्गावर ‘डोमिनार ४००’ ही मोटरसायकल प्रथम अधिकृतपणे ताफ्याचा भाग होणार आहेत. त्यानंतर दैनंदिन कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीच्या कर्तव्यांसाठी तीन पोलिस दलाला उपयुक्त ठरणार आहे. बजाज पुणे ग्रॅण्ड टूरच्या ४३७ कि.मी.च्या मार्गावरील रस्ते पायाभूत सुविधांसह तयार करण्यात आले असून हा मार्ग ९ तालुके आणि १५० गावाच्या शहरी आणि ग्रामीण भागातून जातो. अशा वेळी नवीनतम दळणवळण तंत्रज्ञान आणि आपत्कालिन यंत्रणेने सुसज्ज अशा या डोमिनार ४००’ पोलिस विशिष्ट मोटरसायकल पोलिस दलांना कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. ‘डोमिनार ४००’ मोटरसायकली पोलिस कर्मचाऱ्यांना प्रभावीपणे गस्त घालण्यासाठी आणि शहरी व ग्रामीण भागांमध्ये जलद आपत्कालीन प्रतिसादासाठी खास करुन तयार करण्यात आल्या आहेत.

डोमिनार ४०० : आधुनिक मोटरसायकल पोलिसांना आव्हानात्मक कामे करतांना लागणाऱ्या गरजांचा विचार करून त्यांच्या मूळ आवृत्त्यांपेक्षा मोठ्या प्रमाणात सुधारित करण्यात आल्या आहेत. सुधारित दृश्यमानता आणि दळणवळण: वाहतूक व्यवस्थापित करण्यासाठी आणि घटनांना प्रभावीपणे प्रतिसाद देण्यासाठी ‘डोमिनार ४००’ मध्ये शक्तिशाली एलईडी आपत्कालीन दिवे, सायरन आणि पुश-टू-टॉक रेडिओ ट्रान्समिशनसह सार्वजनिक घोषणा प्रणाली बसविण्यात आली आहे. यामध्ये जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम आणि मोबाईल फोन व वॉकी-टॉकीसारख्या आवश्यक उपकरणांसाठी चार्जिंग पॉइंट्स यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

प्रत्येक ‘डोमिनार ४००’ मध्ये आपत्कालीन प्रथमोपचार किट बसविण्यात आले आहे. या बाइक्समध्ये एकात्मिक आणि कुलूप लावता येण्याजोग्या साइड पॅनियर्ससह टॉप बॉक्स येतो, जो प्रथमोपचार किट, फॉरेन्सिक साधने आणि कागदपत्रे यांसारखी आवश्यक उपकरणे वाहून नेण्यासाठी तयार करण्यात आला आहे. सुधारित कार्यक्षमता, हाताळणी आणि सुरक्षा: शक्तिशाली ३७३.३ सीसी लिक्विड-कूल्ड इंजिन आणि विश्वसनीय कार्यक्षमतेसह सुसज्ज असलेल्या ‘डोमिनार ४००’ मध्ये हाय-स्पीड पाठलाग किंवा आव्हानात्मक परिस्थितीत उत्तम हाताळणी, कुशलता आणि सुरक्षिततेसाठी अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम , ट्रॅक्शन कंट्रोल आणि इलेक्ट्रॉनिक सस्पेंशन ॲडजस्टमेंट यासारखी प्रगत रायडर सहाय्यक वैशिष्ट्ये आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गोखलेनगर वाकडेवाडी भागातील वसाहतीतील जनतेला चांगल्या सुविधा मिळवून देणार: आम आदमी पार्टी

पुणे:गोखलेनगर, वाकडेवाडी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वसाहती असून त्यामध्ये ड्रेनेज...

अत्याधुनिक इंजिनिअरिंग कॉलेज,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि आबा बागुलांच्या जाहीरनाम्यात पर्यावरण हमी

सर्वसमावेशक विकासाचेच धोरण:आबा बागुल नगरविकास विभागामार्फत भरघोस निधी होणार उपलब्ध ...